टोलमाफी ते धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा, तब्बल 19 मोठे निर्णय; शेवटच्या बैठकीतही शिंदे सरकारचा धडाका

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून लागण्याची शक्यता असताना त्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक मोठ्या निर्णयांची घोषणा झाली. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे.राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता ही शिंद सरकरची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्याता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईत पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी, धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125 एकर जागा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय घेण्यात आले आहे.

धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125 एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. देवनार डम्पिंग ग्राउंडची 125 एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोरिवलीची जागा दिल्यानंतर या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवनार डम्पिंग ग्राउंडच जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावी पुनर्विकास अदानी समुह करत आहे. तसेच राज्यातील दोन मोठ्या नदी जोड प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. दमणगंगा, गोदावरी नदी जोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे,

मंत्रिमंडळाचे धडाकेबाज 19 निर्णय

1.मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ, आज रात्री 12 पासून अंमलबजावणी

2.आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)

3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

4.दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)

5.आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)

6.वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

7.राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)

8.पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)

9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)

10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) 2.0 राबविणार

11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)

12.लकिल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)

13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)

14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)

15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)

16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)

17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट

18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)

19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)

Hot this week

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

Topics

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

तब्बल ४८ वर्षांनंतर केंदूर–पाबळकडे अध्यक्षपदाची संधी?

माजी सभापतींसह १४ सरपंच एकवटले; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत शिरूर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img