देशातील प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं निधन झाले आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. अखेर त्यांनी बुधवारी (ता. 9) रात्री उशिरा टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला.

दोन दिवसांपूर्वीच रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते.. त्यांच्या अनेक शारीरिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. डॉ. शाहरुख हे एक नामांकित डॉक्टर म्हणून ओळखले जातात.

अधिक वाचा  अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी Halwa Ceremony का साजरी केली जाते? त्यामागचा उद्देश काय?

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला होता. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सुनी टाटा होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले होते. शिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर परदेशात शिक्षण घेतले. त्यांची एकूण 3,800 कोटी रुपये त्यांची संपत्ती आहे.

काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रकृतीविषयीची माहिती दिली होती. त्यात त्यांनी वयोमान लक्षात घेता माझ्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत, काळजी करण्यासारखं काहीही नाही, असं टाटा यांनी त्यावेळी म्हटले होतं.

अधिक वाचा  छावा चित्रपटाला विरोध, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची पहिली प्रतिक्रिया; “तज्ज्ञांना दाखवूनच…”

देशाच्या कानाकोपऱ्यातून रतन टाटांच्या प्रकृती स्वास्थासाठी व ते लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केल्या जात आहे. सोशल मीडियातून त्यांच्यासाठी ‘गेट वेल सून’ यांसारख्या मेसेजद्वारे पोस्ट केले जात आहे. टाटा कंपनीच्या माध्यमातून लाखो कुटुंबांचं त्यांच्याशी एक भावनिक नातं जोडलं आहे. अनोखी देशभक्ती व देशहिताचं उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.