पुणे शहरात वाढतं भारतीय जनता पक्षाचे वलय…. अन् शिवसेनेची दिवसेंदिवस पुणे शहर आणि जिल्ह्यात होत असलेली अधोगती! याचा गंभीर विचार करत उद्धव ठाकरे यांनी एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची ‘मातोश्री’त चांगलीच ‘शाळा’ घेत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या 75 हजारांच्या मताधिक्याची कारणमिमांसा केली. यावेळी कोथरुडचे प्रतिनिधित्व करणारे आणि मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या समोरच रात्रंदिवस असणारे पुणे शहराध्यक्षांची खरपूस ‘कानउघडणी’ करत कोथरूड विधानसभा मतदारसंघाची दावेदारीच सोडण्याचे संकेत दिले आहेत. एक तर लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार असलेल्या भाजपाला 70 हजाराच्यावर मिळालेले मताधिक्य आणि दोन कट्टर शिवसैनिकांची सुरू असलेली पारंपरिक स्पर्धा या सर्व गोष्टी वरती रामबाण उपाय म्हणून कोथरूड मतदारसंघ ऐवजी पुणे शहरातील अन्य मतदारसंघावर ती दावा करण्याचे संकेत मातोश्री होऊन देण्यात आल्याने सध्या खळबळ उडाली आहे.
राज्यातील सत्तेची गणिते आणि आघाडीधर्म यामुळे पुणे जिल्हा आणि शहर भागातील विस्कटलेली घडी बांधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुणे शहराची जबाबदारी खासदार, प्रवक्ते संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर व पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर या तीन नेत्यांकडे दिली परंतु गेली दोन वर्ष पुणे बांधणी करण्याचं काम सुरू असतानाही लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणावे तसे संघटन कौशल्य आणि मतपरिवर्तनाची ताकद पुणे शहरातील कोणत्याही मतदारसंघांमध्ये जाणवली नाही. पुनर्बांधणी केलेल्या जुन्या अन् नव्या कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 3 ऑगस्ट रोजी मेळावा घेऊन पक्षाकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले असले तरी पुणे शहरांमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा एकही मतदारसंघ नसल्यामुळे पुणे जिल्हा आणि शहर बाबत मातोश्री धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली 2009 साली विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर प्रथमच पुणे शहरातील हडपसर आणि कोथरूड या भागात शिवसेनेने भाजप शिवसेना एकत्र निवडणुकीला सामोरे जाऊन विजय मिळवला खरा पण 2014 मध्ये जी पक्षाला अधोगती लागली ती आजपर्यंत कोणतीही दिलासादायक घडामोड दिसत नाही. पुणे शहरातील मतदारसंघाचा विचार करता हडपसर विधानसभा मतदारसंघावरती शरद पवार गटाचा दावा करण्यात आला आहे एकमेव कोथरूड विधानसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने किंवा काँग्रेसच्या वतीने दावा करण्यात आला नसला तरी या मतदारसंघातील परिस्थिती सुद्धा शिवसेनेच्या वतीने खूप दिलासादायक अशी नाही ही थांब भूमिका मातोश्री मधूनच घेण्यात आल्याने कोथरूडमधील इच्छुकांचे दाबे दणाणले आहेत.
पुणे शहरामध्ये सध्या भाजपाचे 100 नगरसेवक 5 आमदार अशी दमदार कामगिरी असताना शिवसेना मात्र एक आकडी नगरसेवकांवर अडकली आहे. दोन आमदारांचे यशस्वी झालेले मतदारसंघ ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात गेले जिल्ह्यात पक्षाची वाटचाल शून्यावर आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी आणि इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू असताना मातोश्री मात्र स्ट्राईक रेट चा विचार करत वेगळा धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात काही विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळण्याची गणिते जुळत असल्यामुळे शहरापेक्षा जिल्ह्याला जास्त महत्त्व देण्याचा कल असल्याचे संकेतही मातोश्री मधून मिळाले आहेत.
पुणे शहर शिवसेनेकडूनही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. पर्वती, हडपसर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा (हडपसर आणि कोथरूड माजी आमदार) करण्यात आला आहे. या मतदारसंघांतील इच्छुकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे. सध्या शहरांमध्ये एकच चर्चा सुरू आहे ते म्हणजे कोथरूड मधून कोणाला संधी देणार माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि पुणे महापालिकेचे गट नेते पृथ्वीराज सुतार या दोघांनीही प्रचाराचा शुभारंभ गाठीभेटी मेळावे आणि छोटेखाणी उपक्रम सुरू केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच खासदार, प्रवक्ते संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्याकडे वारंवार आपण हा मतदारसंघ विजयी होऊ अशी मांडणी केली आहे परंतु मातोश्रीवरून मात्र आकडेवारीचा हवाला देत आणि संघटन मजबूत नसल्याची कारणे सांगत त्यांच्या मागणीला ‘होल्ड’ वर ठेवण्याचे काम केले जात आहे.
इच्छुकांचा वाढता रेट लक्षात घेऊन नुकतेच मातोश्री वरती कोथरूड विधानसभा मतदारसंघाची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी लोकसभा निवडणुकी दरम्यान (मध्यरात्री मयुर 11) घडलेल्या घडामोडी आणि सध्या विधानसभेच्या तयारीमध्ये सुरू असलेली इच्छुकांची स्पर्धा या दोनच मुद्द्यांवरती शहराध्यक्षांसह सर्वच पदाधिकाऱ्यांची शाळा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. महाविकास आघाडीमध्ये मतदारसंघ मागणीची प्रमुख भूमिका घेऊन गेलेल्या पदाधिकाऱ्यांनाच उद्धव ठाकरे यांनी उलट प्रश्न विचारत यावर उत्तर काय? आणि या दोघांचा समेळ कोण घालणार? हे अगोदर ठरवा आणि नंतर माझ्याकडे या! अशी भूमिका घेतल्याने कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेकडे हा मतदार संघ राहणार की नाही ही नवी चर्चा सुरू झाली आहे.