अमित शाहांचे मिशन मुंबई, दोन दिवसीय दौऱ्यात आखली जाणार विशेष रणनिती

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगलाच फटका बसला होता. यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध रणनिती आखली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. त्यातच आजपासून दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते मुंबईतील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. अमित शाह यांचे मुंबईत स्वागत अशा आशयाचे बॅनर सध्या मुंबईत झळकताना दिसत आहेत. अमित शाह यांनी आज दुपारी 1.30 वाजता मुंबईतील आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. दादर येथील स्वामी नारायण मंदिरातील योगी सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नवी मुंबईतही बैठक
अमित शाह हे मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर असताना मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार तसेच पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. मुंबईतील बैठकीनंतर अमित शाह हे संध्याकाळी 4.30 च्या सुमारास नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियममध्ये बैठक घेणार आहेत. यावेळी ते ठाणे व कोकण विभागातील आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील.

मुंबईतील विधानसभा मतदारसंघांबद्दल सह्याद्रीवर खलबतं
या दोन्हीही बैठकींनंतर आज रोजी सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला स्वत: अमित शाह उपस्थितीत असणार आहे. यावेळी अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. यावेळी अमित शाह हे मुंबईतील विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार असल्याचे बोललं जात आहे.

पहिली यादी नवरात्रीत येणार?
दरम्यान महायुतीच्या घटक पक्षांकडून 80 टक्के जागा वाटपावर एकमत झाले आहे. यानुसार भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 125 ते 140 जागा लढवणार आहे. तर शिंदे गट 70 ते 75 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. कमी जागा लढवून त्या जिंकून स्ट्राईक रेट चांगला ठेवायचा आणि सत्तेत प्रमुख पदावर दावा करायचा, असा मानस शिवसेनेने केला आहे. येत्या नवरात्रीत महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Hot this week

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते खाद्य उद्योजक अमित गोखले यांना “बिझिनेस एक्सलन्स पुरस्कार” प्रदान

पुणे : मराठी उद्योजकतेचा अभिमान ठरलेल्या खाद्य उद्योजक अमित गोखले यांना...

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

Topics

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे  :  सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img