महाविद्यालयीन काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांची प्रेरणा अन् राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बांधिलकी अन् 2008 सालापासून ‘कमळ’ सेवेच्या विविध जबाबदाऱ्या पार पडताना समाधान शोधत ‘पुनीत’ नावाचा संघनिष्ठित विश्वासार्ह ‘मोहरा’ कोथरूड विधानसभा आणि पुणे शहरामध्ये उमलतोय अन् घडतोयही! केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि नामदार चंद्रकांतदादा पाटील या दोन उच्चस्थ नेतृत्वाच्या पसंतीला पडत मिळेल ती जबाबदारी लीलया पार पाडत पुनीत श्रीकांत जोशी हे नाव आज घराघरात पोहोचत आहे. पुनीत नावातील गुणवैशिष्ट्याप्रमाणेच इतरांना मदत करण्यावर विश्वास, परोपकारी कृत्यांत रमणे, एक मित्र म्हणून अत्यंत सभ्य आणि विश्वासार्ह वृत्तीत कोथरूड भारतीय जनता पक्षामध्ये एक वलय निर्माण करणारा व्यक्तिमत्व! अशा या व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रेरक विचाराने पुनीत जोशी हे 2008 साली विद्यार्थी आघाडी शाखा प्रमुखच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या पक्ष कार्यामध्ये सहभागी झाले. त्यानंतर एक उमदा तरुण पक्षासाठी अहोरात्र झटत आहे याची जाणीव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यास सुरुवात झाली. 2009 लोकसभा निवडणूकीत स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पुनीत जोशी यांना पक्ष संघटनेमध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाची जबाबदारी देण्यात आली. पुण्यामध्ये 2014 साली प्रथमच शहरभर थ्रीडी सभा, LED सभा याचे आयोजन करण्यात आले होते या सर्व प्रचार यंत्रणाची मुख्य जबाबदारी पुनीत जोशी त्यांच्याकडे देण्यात आली होती. पुणे शहरात प्रथम 2014मध्ये यश मिळाल्यानंतर विद्यमान खासदाराला डावलून पक्षाच्या वतीने 2019 मध्ये स्वर्गीय गिरीश बापट यांना संधी देण्यात आली आणि या प्रचाराची धुराही पुन्हा पुनीत जोशी यांच्यावरच पक्ष संघटनेच्या वतीने देण्यात आली. सर्व प्रचार सभांचे नियोजन करण्याची महत्त्वाची जबाबदारी लीलया पार पाडल्यानंतर या नेतृत्वाच्या उदयाला शुभारंभ झाला.
पुणे शहरात विविध निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी सक्रिय कार्यकर्ता म्हणून पुणे जोशी यांचे नाव उदयाला येत असतानाच पक्षीय पातळीवरही त्यांच्यावरती विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. यामध्ये 2013 साली विद्यार्थी आघाडी प्रमुख म्हणून पद मिळाल्यानंतर पूर्ण शहरांमध्ये विद्यार्थ्यांचे संघटन केले याची दखल घेऊन 2016 मध्ये पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस ही नवीन जबाबदारी देण्यात आली. एखादा नेतृत्व घडताना ‘कलागुण’ कायमच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करतात आणि पोलीस जोशी यांच्या बाबतीतही तेच झाले युवा मोर्चाची असलेली जबाबदारी सांभाळतानाच 2017 साली कोथरुड विभाग विस्तारक मुख्य पक्ष संघटनेत सक्रिय होण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2019 लोकसभा प्रचारसभा प्रमुख स्वर्गीय गिरीश बापट यांच्याबरोबर 22 दिवस केलेल्या कामाची पावती म्हणून 2019 साली राज्यातील सर्वात तरुण मंडल अध्यक्ष जबाबदारी देण्यात आली. कोथरुड विधानसभा अध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर कोथरूड विधानसभा मतदारसंघांत आजही अविरत भारतीय जनता पक्षाचे काम करत हा चेहरा अविरत झटत आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांनी संयुक्तपणे 2023 साली पुणे शहर सरचिटणीस या मानाच्या पदावर ती नियुक्ती केली परंतु त्याबरोबरच कोथरुड विधानसभा मतदारसंघाची निवडणुक प्रमुख ही अतिरिक्त जबाबदारी देत पुनीत जोशी यांच्या कलागुणांना आणि संघटन कौशल्याला पैलू पाडण्याचे काम केले. पुनीत जोशी यांचे ‘संघटन आणि कल्पक’ता याची चुणूक 2024 च्या लोकसभा निवडणूक प्रचार अभियान प्रमूख म्हणून केलेल्या कामाने दिसून येत आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात प्रथमच सर्व मूळ कोथरूडकर इच्छुक उमेदवार खासदार आणि मंत्री झाल्यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघात नव्या फळीतील विश्वासार्ह नेतृत्व म्हणून पुन्हा एकदा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी यांच्याच कडे पाहिले जात आहे.
पुनीत जोशी यांचं कामाबद्दलचं मत बांधिलकी अन् समाधानच-
पुनीत नावातील अंकशास्त्रानुसार प्रेमळ, शक्ती शोधणारा, भौतिकवादी, निष्पक्ष, स्वावलंबीपणे पक्षाची चांगली प्रतिष्ठा निर्माण करण्यास कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत असून कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये नवतरुणांची एक प्रभागानुसार फळी तयार काम केले जात आहे. घराणेशाही आणि पारंपारिक विचारांच्या तरुणांपेक्षा विविध प्रकारचे तरुण नवतरुणांच्या संघनिष्ठ फळीमध्ये समाविष्ट होत असून अहोरात्र मदत करण्याची जबाबदारीही हा तरुण पार पाडत आहे.