पुण्यातील गणेशोत्सव म्हटलं की रस्त्याच्या कडेला लागलेले रथ! महिन्यांना महिने उभे असलेले सभामंडप अन् कमानी असे चित्र सामान्य पुणेकरांना अंगवळणी पडलेले असताना कोथरूड मुख्य डीपी रस्त्यावर असलेल्या ‘संयुक्त भेलके नगर मित्र मंडळ’ च्या कार्यकर्त्यांनी मात्र संपूर्ण पुणे शहरासाठी एक असा अनोखा संदेश देण्याचे काम केलं ते म्हणजे विसर्जन मिरवणुकी नंतर 24 तासात संपूर्ण रस्ता चकाचक! विशेष म्हणजे सामाजिक जाणिवेची भान असलेल्या आणि मूळ शिवसैनिक असलेल्या मंडळाचे आधारस्तंभ उमेश भेलके विभाग संघटक यांच्यामार्फत सामान्य नागरिकांच्या हिताची भूमिका घेत हा अभिमानास्पद निर्णय घेण्यात आल्याने या मंडळाची वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
गणरायाची भक्तिभावाने सेवा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची निर्मिती केली असली तरी आजचा पुणे शहरातील गणेश उत्सवाचा स्वरूप पाहिलं तर पारंपारिक आणि कौटुंबिक गणेश भक्तांसाठी खरंच गणेश विसर्जन राहिला आहे का? अशा स्थितीत पुण्यातील गणेशोत्सव असताना संयुक्त भेलके नगर मित्र मंडळाच्या वतीने मात्र ‘सुवर्ण’ महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असताना या वाटचालीला अभिमानास्पद पाऊल टाकत एक अभिनव उपक्रम निर्माण केला आहे. या मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम सर्व दूर पोहोचल्यास खरोखरच पुन्हा पुणेकरांना अभिमान वाटेल या अशा स्थितीमध्ये पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव पोहोचल्याशिवाय राहणार नाही.