नाशिक : अंतरवली सराटीत झालेल्या मराठा आंदोलनाबाबत मंत्री छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा केला आहे. अंतरवली सराटी येथे झालेल्या मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे तिथून निघून गेले होते, पण रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगे यांना पुन्हा तिथं आणून बसवलं असा दावा भुजबळ यांनी केला आहे. छगन भुजबळ यांनी रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप करताना मनोज जरांगे यांना आणल्यानंतर या दोघांनीही दुसऱ्या दिवशी सकाळी शरद पवारांना देखील तिथे बोलावून घेतलं असेही म्हटले आहे. इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांवर देखील दगडफेक झाली आहे, याबाबत शरद पवार यांना कल्पना नव्हती असेही भुजबळ म्हणाले आहेत. दरम्यान छगन भुजबळ यांच्या दाव्यानंतर पुन्हा नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नरेंद्र मोदी यांना पत्र, पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी

मनोज जरांगे काय म्हणाले?

२ सप्टेंबर २०२३ रोजी अंतरवली सराटी येथे लाठीचार्ज आणि दगडफेक झाली त्यामागे रोहित पवार आणि राजेश टोपे या दोन्ही नेत्यांचा हात होता असं स्थानिक लोकांचे मत आहे असा दावा भुजबळांनी केला. याबद्दल विचारले असता, जरांगे म्हणाले की, त्यांना आरोप करण्यापलीकडे काही काम राहिलं नाही. तुमच्या मागे फडणवीस यांची शक्ती आहे ना मग हे सिद्ध करा ना. सिद्ध करा आणि तुरूंगात टाका काही आडचण नाही. आम्ही त्यांचं बोलणं मनावर घेत नाही असे जरांगे यावेळी म्हणाले.

यांना मारामाऱ्या, दंगली घडवून निवडणुका लढवायच्या आहेत. छगन भुजबळ हे सगळ्यात मोठे महापापी आहेत, यांना गोरगरीब ओबीसी मराठा यांच्यात वाद लावायचे आहेत. त्यांना आपण किती ज्येष्ठ आहेत हे त्यांना कळत नाहीये. ते फक्त आरोप करणे आणि दंगली घडवण्याच्या मागे लागले आहेत. ते काहीही सांगत आहेत.

अधिक वाचा  खडकवासला नवी चर्चा महायुतीत ‘बंडाळी’ची तर यामुळं ‘तुतारी’ही उमेदवार बदलण्याची नवी शक्यता

टोपे आणि रोहित पवारांनी जरांगेंना परत आणून बसवले असे भुजबळ म्हणाले याबद्दल विचारले असता यामध्ये काहीच लॉजिक नाही. त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाहीये. ओबीसी बांधव देखील त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये असे उत्तर मनोज जरांगे यांन दिले.

अंतरवलीत काय झालं होतं?

जवळपास एक वर्षापूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली होती. मात्र प्रशासनाकडून उपोषण मागे घेण्याची विनंतर त्यांनी फोटाळून लावली. जरांगे उपोषणावर ठाम होते.

अधिक वाचा  मनोज जरांगेंना पत्र देऊन 9 दिवस उलटले तरी यासाठी परवानगी मिळेना, मराठा समाजही आक्रमक

यादरम्यान पोलिसांकडीन आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. यावेळी आंदोलकांनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्याचे देखील समोर आलो होते. पुढे हे प्रकरण चांगलेच पेटल्याचे पाहायला मिळाले. तसेच हा लाठीचार्ज केल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आला.