राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं बंड अन् त्यानंतर पुणे शहरात सुरू झालेली पतझड कोथरूड विधानसभा मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण करून गेली तरीसुद्धा विचारांची ‘पालखी’ अविरत टिकण्यासाठी महाराष्ट्रातील पाहिला ‘शरदमित्र’ हा कल्पक उपक्रम त्याच कोथरूडमध्ये तेही छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांच्या समोर भव्यदिव्य कार्यक्रम घेऊन कोथरूड राष्ट्रवादीत ‘गिरीश’ नावाचा दृढ ‘नवांकुर’ उमगला आहे. …फक्तं साहेबांसोबत या विचार अर्पित उपक्रमाची दखल दस्तूर खुद्द शरद पवार यांनी घेतली आणि ....ही कौतुकाची थाप आभाळ ठेंगणे झाल्याची जाणीव करून गेल्यामुळेच मोठी पोकळी निर्माण झालेल्या कोथरुड विधानसभेमध्ये सर्वात भक्कम संघटन पुन्हा तयार करून ‘…फक्तं साहेबांसोबत’ या विचारास अर्पित ‘आयुष्यवेल’ जगण्याचा संकल्प ‘गिरीश’ने केला अन् दृढ विचार साधनेतच त्याची ‘आयुष्यवेल’ही आज बहरतेय! गिरीश अर्थात ‘पहाडाचा स्वामी’ भगवान शिवाचे एक नाव! पक्षीय पातळीवर आणि स्थानिक पातळीवर असंख्य विघ्न आली तरीही हा
साहेबांचा शिलेदार राजकारणातील हा ‘पहाडच माझा स्वामी’ मानत वाटचाल करत असून प्रचंड पडझड झालेली असतानाही ‘तुतारी’चा निनाद मतदारसंघात घुमवत आहे. भगवान शिवाप्रमाणे विचारावरती दृढ आणि कार्यावर आरूढ या व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
राजकीय सामाजिक जीवनाची वाटचाल करण्यासाठी ‘गर्दी पेक्षा दर्दी’ किती गरजेची याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांचे काम पाहिले की हमखास लक्षात येते. गिरीश गुरूनानी यांचे अभिनव उपक्रम आणि हाताळलेले विषय याचा जर आढावा घेतल्यास सामाजिक अस्मिता अन कल्पकता याच्या जीवावर आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातील युवकांचे संघटन वेगवान पद्धतीने वाढवत विचारांच्या साधनेचा ‘शिव’यज्ञ गिरीश गुरूनानी अविरत तेवत ठेवला आहे. सामाजिक जाणिवेतून निर्माण झालेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कायमच कल्पकतेचे बॅनर ही गिरीश गुरूनानी यांची ओळख. व्यक्तीपेक्षा विचार आणि संवेदना महत्त्वाच्या या उक्तीवर राज्यपाला पासून सर्वांना आपल्या बॅनरमधून एक अनोखा संदेश देण्याची किमया गिरीश गुरनानी यांना लीलया जमते.
मग ती घटना बदलापूरची असो, निवडणुक निकाल असो, की दस्तूरखुद्द राज्यपालांनी छत्रपतींचा केलेला अवमान असो कोथरूड येथे ‘कल्पक’ निषेधाचे फलक हमखास कोथरूडमध्ये लागतातच! आपण कसं घडलो राहिलो यापेक्षा कोणते ‘विचार’ आपल्याला प्रेरक असतात या एकमेव विचारावर कोथरुड राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एका भक्कम खांद्यावर जबाबदारी लीलया पार पाडली जात आहे.
सत्तेची पदे उपभोगण्यास सध्या कोथरूडमधील असंख्य इच्छुकांनी सत्ताधारी पक्षाची पालखी खांद्यावर घेतली असली तरीसुद्धा विचारांची ‘पालखी’ मात्र कोथरूड मतदारसंघात दोन (स्वप्निल -गिरीष) स्वाभिमानी खांद्यावर अभिमानाने डोलत आहे. पुणे शहरातील सर्वात भक्कम संघटन पुन्हा तयार करून कोथरूड विधानसभेमध्ये सुसंस्कृत उच्चशिक्षित आणि सामाजिक जाणिव असलेल्या विचारांची फळी पुन्हा एकदा कोथरूड विधानसभा मतदारसंघांत फक्त साहेबांसोबत हा दृढ ‘नवांकुर’ शिवयज्ञ तेवत ठेवून अर्पित ‘आयुष्यवेल’ विचारवृक्षावर बहरवत आहेत.