‘हॅट्रिक’ पंतप्रधान मोदींच्या ‘सब का साथ सब का विकास’ विचाराची प्रेरणा घेऊन खडकवासला विधानसभा मतदारसंघ 30 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ‘रयतेचे राज्य’ संकल्पना घेऊन विरोधकांचे प्रचंड हल्ले होत असताना ‘हॅट्रिक’ जनसेवेत मग्न हा संघनिष्ठीत आमदार भीमराव (अण्णा) तापकीर हा भगवा ‘मोहरा’ ….आपला माणूस! ही बिरुदावली अभिमानाने मिळवत आहेत. सत्ता मिळाल्याने नेतृत्वामध्ये होणारे बदल खडकवासला विधानसभा मतदारसंघ मात्र याला अपवाद आहे. आमदार भीमराव (अण्णा) तापकीर सलग तीनवेळा विजयी झाले परंतु विजयी अहंकाराचा दंभ कधी त्यांच्या वृत्तीत दिसला नाही अन् कधी ‘वेडे’वाकडे’ मनसुभेही त्यांनी आखले नाहीत फक्त ….शुद्ध सात्विक विचारात नित्य जनसेवेत ‘प्रसन्न’ चेहरा हीच आमदार भीमराव (अण्णा) तापकीर यांची बिरुदावली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून अत्यंत दुर्लक्षित समाजाच्या मनामनात पोहचण्यात यशस्वी झालेल्या अजातशत्रू व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या newsmekar.live तर्फे हार्दिक शुभेच्छा!

सलग तीन वेळा मतदारांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाला बांधील राहत ‘हॅट्रिक’ पंतप्रधान मोदींच्या विचारानुसार विकासगंगा घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र व राज्याकडून निधी मिळत 15 ते 20 वर्षांत रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी अविरत कामामध्ये आमदार भीमराव तापकीर कायम व्यस्त असतात त्यांच्या प्रयत्नांना यश येत आज खडकवासला विधानसभा मतदारसंघ विकासाची कात टाकत आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या पश्चिमद्वारावर भव्यदिव्य चांदणी चौक लोकार्पण करण्यात आल्यामुळे दैनिक वाहतूक होणाऱ्या एक लाख वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचा  महायुती 2.0 नव्या मंत्र्यांचा शपथविधी 11 डिसेंबरला?; ‘या’ खात्यासाठी तिघांच्याही या नेत्यांची रस्सीखेच

पुणे पश्चिमद्वाराचा ‘मोकळा श्वास’ आणखी सुखद होणार 

चांदणी चौक बहुमजली उड्डाणपुल पूर्ण झाल्यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पश्चिमेकडील वाहतूक कोंडी दिलासा मिळाला आहे तर स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रोस मंजुरी मिळाल्याने पूर्वेकडील सातारा रोड परिसरातील सार्वजनिक वाहतूकीवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तर दक्षिणेकडील प्रवेशद्वार असलेल्या कात्रज उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात असल्यामुळे नवले पूल ते कात्रज चौक सहा पदरी रस्त्याप्रमाणेच स्थानिक नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. खडकवासला मतदारसंघातील मध्य भागातून सिंहगड पायथा ते स्वारगेट हा नित्य वापराचा रस्ता वाहतूक कोंडीने त्रस्त आहे. या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी नदीपात्रालगत विठ्ठलवाडी ते नांदेड सिटी एक पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे या रस्ताचे काम अर्धवट अवस्थेतच बंद करावे लागले. परंतु नागरी हितासाठी कायमच वचनबद्ध असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वच नागरिकांना अभिमान वाटावा असा सिंहगड रोडवर सर्वात लांब उड्डाण पुलाचे काम विक्रमी प्रगतीसह पूर्णत्वाकडे जात असून अवघ्या काही महिन्यांमध्येच या रस्त्याचेही लोकार्पण झाल्यानंतर ही समस्या ही मार्गी लागेल असे आमदार तापकीर यांचे मत आहे.

अधिक वाचा  एकनाथ शिंदे गावी का गेले? बोलण्याच्या ओघात गोगावलेंनी सगळं सांगितले त्यांची अशी तयारी पण आमचा हा आग्रह!

विकासचक्रे अधिक वेगवान करण्यास  मेट्रो मार्गिका- 

खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये रस्ते वाहतुकीच्या समस्या मार्गी असल्या तरी विकासाची चक्रे आर्थिक वेगवान करण्यासाठी खडकवासला मतदारसंघांमध्ये ही मेट्रोमार्गिका होणे ही काळाची गरज लक्षात घेऊन आमदार भीमराव तापकीर यांनी चांदणी चौक ते कात्रज आणि डेक्कन जिमखाना ते खडकवासला मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्यासाठी आग्रही मागणी करत आहेत या मार्गांचा ‘डीपीआर’ मंजुरी घेऊन खडकवासला मतदारसंघात मेट्रो मार्गी का कार्यान्वित करण्याचा मानसही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामरस्ते अन् सार्वजनिक बांधकाम तसेच ग्रामविकास विभागाकडून मोठा निधी उपलब्ध करून सिंहगड खोऱ्यातील दुर्लक्षित भागातही जास्तीत जास्त लोकोपयोगी दीर्घकाळ टिकणाऱ्या विकासकामांसाठी गेली दहा ते पंधरा वर्षे आमदार भीमराव तापकीर यांच्या मार्फत काम केले जात आहे. विशेषत: केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे सर्वांगीण विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवीत आहेत.

अधिक वाचा  देवाभाऊंना शरद पवारांना मागे टाकण्याची नामी संधी; शरद पवारांचा चारवेळा मुख्यमंत्री तरीही आता हा विक्रम धोक्यात

सिंहगड आराखड्याची अंमलबजावणीस कटीबद्ध-

खडकवासला मतदारसंघाचा अभिमान सिंहगड किल्ल्याचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार केला असून वन विभागाच्या पुढाकाराने पुरातत्व, पर्यटन, महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ऊर्जा विभाग यांना सहभागी करून विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया करत सर्वांचा समेळ घालून आमदार भीमराव तापकीर यांनी सिंहगडाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी उल्लेखनीय काम केले असून राज्य शासनाच्या वतीने यासाठी ‘विशेष निधी’ उपलब्ध करून महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा नरवीर तानाजी मालुसरे यांनी काबीज केलेला सिंहगड बनवण्याचा मानस असून गडकिल्ल्यांचे सवर्धन करून शिवचरणी आपले कार्य अर्पण करण्याची इच्छा वाढदिवसानिमित्त खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केली आहे.

आमदार भीमराव(अण्णा) तापकीर ‘हॅट्रिक’ जनसेवेतील निवडक कामे-

नवले पूल ते कात्रज चौक सहापदरीकरण रस्ते

बहुमजली चांदणी ‘चौक उड्डाणपूल

स्वारगेट ते कात्रज अंतर्गत मेट्रो

नांदेड पूल

सिंहगडावर थ्रीडी शिल्प

जलयुक्त शिवार(खडकवासला ग्रामीण मध्ये विविध प्रकल्प)

पेयजल योजना

हायब्रीड ॲन्यूईटी अंतर्गत रस्ते

20वर्ष वाहतूक कोंडी शिवणे-उत्तमनगर रस्ता रुंदीकरण

कात्रज चौक उड्डाणपूल

सिंहगड रोप-वे

सिंहगड रोड उड्डाणपूल

कोंढणपूर फाटा उड्डाणपूल

वारजे-पॉप्युलरनगर उडाणपूल

वनउद्यान वारजे