अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिति ट्रस्टच्या वतीने कोथरूड येथे पारंपारिक पद्धतीने “श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा 2024” भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे मंडळातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा कोथरूड भूषण पुरस्कार यावर्षी कोथरूड भागातील सामाजिक कार्यकर्ते व कायम प्रसिद्धीपासून दूर राहणारे आदर्श व्यक्तिमत्व मा श्री चंद्रकांतअण्णा भरेकर यांना कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण प्रसिद्ध हिंदी सिनेअभिनेत्री अमिषा पटेल व पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मा श्री दीपकभाऊ मानकर, मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ उदगिरी शुगर आणि पॉवर लि. चे चेअरमन मा श्री राहुलदादा कदम, वेंकटेश्वरा हैचरीज ग्रुप चे व्यवस्थापकीय संचालक मा जगदीश बालाजी राव साहेब, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा सनीदादा मानकर, रिम कॉलेजचे चेअरमन मा. श्री सूरज शर्मा सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मा श्री दीपकभाऊ मानकर आवर्जून उपस्थित होते तसेच त्यांचा सन्मान मंडळाचे संस्थापक अॅड. राहुल विनायक म्हस्के पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ उदगिरी शुगर आणि पॉवर लि. चे चेअरमन मा श्री राहुलदादा कदम, वेंकटेश्वरा हैचरीज ग्रुप चे व्यवस्थापकीय संचालक मा जगदीश बालाजीराव साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष मा हर्षवर्धनदादा मानकर, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा सनीदादा मानकर, रिम कॉलेजचे चेअरमन मा सूरज शर्मा सर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष मा दुष्यंतदादा जाधव, प्रसिद्ध कायदेतज्ञ अॅड. पुष्कर दुर्गे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक अॅड. राहुल विनायक म्हस्केपाटील, अध्यक्ष मा अमित जाधव खजिनदार अॅड. अतुल म्हस्के व कृणाल पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.