पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा संपल्यानंतर मनू भाकर आणि नीरज चोप्रा यांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. मनू भाकरची आई आणि नीरज चोप्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मनू भाकरची आई नीरज चोप्राचा हात डोक्यावर ठेवताना दिसत आहे. तसेच नीरज चोप्रा नम्रपणे त्यांचं सर्व ऐकून घेत आहे. या व्हिडीओवरुन दोघांमध्ये मनू भाकरसोबतच्या लग्नाची चर्चा होत असल्याचा दावा सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सदर व्हिडीओमध्ये मनू भाकरची आई सुमेधा भाकर यांनी नीरजचा हात घेत त्यांच्या डोक्यावर ठेवला. तसेच बराच वेळ दोघांमध्ये चर्चाही झाल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे. या व्हिडीओवरुन मनू भाकर आणि नीरज चोप्राच्या लग्नाची चर्चा सुरु झाली.
नेटकरी काय म्हणाले?
सदर व्हिडीओवरुन नीरज चोप्राची आई मनू भाकरसोबत लग्नाची चर्चा करत असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर मनू भाकरची आई जावयाच्या शोधात असून लग्नाची चर्चा सुरु असल्याचं म्हटलं आहे. एका युजर्सने मग…ठरलं का?, लग्नाची सुपारी फोडायची का?, असंही म्हटलं आहे.
मनू भाकरचे वडील काय म्हणाले?
मनू भाकर आणि नीरज चोप्रा यांच्या लग्नाच्या बातमीबाबत मनू भाकरचे वडील राम किशन भाकर यांनी सर्व काही स्पष्ट केले. मनू भाकर अजून खूप लहान आहे. तिचे आता लग्नाचे वय नाही. मनूने अजून लग्नाचा विचार केलेला नाहीय, असं तिचे वडील म्हणाले. तसेच मनू भाकरची आई नीरज चोप्राला आपल्या मुलाप्रमाणे मानते, असंही राम किशन भाकर म्हणाले.
कोण आहे मनू भाकर?
22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.