हडपसर येथे सभासद नोंदणी अभियान उपक्रम
पुणे (प्रतिनिधी) : सभासद नोंदणी, रक्तदान शिबिरे, व विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्ह प्रत्येक घरात पोहोचवण्याचे काम सुरू असून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना सत्तेत येणार असा दावा पुणे सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हडपसर विधानसभा विभागप्रमुख दत्ताभाऊ खवळे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर गाडीतळ येथे शिवसेना सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, विधानसभा संघटक संजय सपकाळ, उपविभागप्रमुख संतोष होडे, महेंद्र बनकर, शाखा प्रमुख अनिकेत सपकाळ, कुणाल वाघ, अनिल हावळे, उपशाखा प्रनुख सुरेश दोरी, कुणाल सपकाळ, गोट्या पाटोळे, सुरज अहिवळे, शुभम जाधव, बाळा कांबळे, लक्ष्मण सूर्यवंधी, आयुष कांबळे, योगेश कांबळे, भूषण कोरडे, निवृत्ती चव्हाण, अनिकेत कुशवाहा, अमित कुशवाहा आदिसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेकडो युवकांनी यावेळी सभासद फॉर्म नोंदणी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण पुणे शहरात सभासद नोंदणी व विविध उपक्रम राबवून कार्यकर्त्यांची बांधणी केली जात आहे शिवसेनेचे मशाल चिन्ह उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना जोरदार मुसंडी मारणार असा विश्वास शहर प्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केला.
हडपसर मध्ये सभासद नोंदणी मोहीम १५ ऑगस्ट पर्यन्त असून युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागप्रमुख दत्ताभाऊ खवळे यांनी केले.