मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी मुस्लिम समाजाला फायदा जास्त झाला आहे. त्यामुळे त्यांना आता मराठा समाजामध्ये आधुनिक महम्मद अली जिना आला नाही ना असा प्रश्न विचारला जातं आहे. मनोज जरांगे आधुनिक महम्मद अली जिना असे म्हणत भाजप आमदार नितेश राणेंनी टीका केली आहे. मनोज जरांगे गोधडीत असताना नारायण राणेंनी आरक्षण मिळवून दाखवलं, असे देखील नितेश राणे म्हणाले. ते पत्रकरांशी बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, नारायण राणे आणि प्रवीण दरेकर सत्य सांगत आहेत. मराठा समजला प्रबोधन करत आहेत . मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी मुस्लिम समाजाला फायदा जास्त झाला आहे. त्यामुळे त्यांना आता मराठा समाजा मध्ये आधुनिक महम्मद अली जिना आला नाही ना असा प्रश्न विचारला जातं आहे. मराठ्यांसाठी लढताय की मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुस्लिमांसाठी लढताय. जरांगे गोधडीत असताना नारायण राणे आरक्षण मिळवून दाखवले आहे. मनोज जरांगे तुझ्या शाळेत राणे आणि दरेकर प्राध्यापक होते. मनोज जरांगेच्या दाढीवर आतां संशय यायला लागला आहे. नक्की तू मराठा आहेस, की आधुनिक महम्मद अली जिना?
आंदोलकांना बदनाम करण्याची हिंमत राऊतांनी करू नये
राज ठाकरेंच्या वाहनावर सुपारी फेकण्यात आल्या याविषयी बोलताना नितेश राणे म्हणाले, आंदोलन करायला सांगायचे आणि मग पॅन्ट पिवळी झाली की ते आमचे नाहीत. हे फक्त राऊत आणि उद्धव ठाकरे करू शकतो. कुठलाही कडवट मराठा असे करणार नाही. उबाठाचे महाविकास आघाडीचे आणि तुतारीचे कार्यकर्ते होते. मराठा आंदोलकांना बदनाम करण्याची हिंमत संजय राऊत यांनी करू नये.
मविआचा बुरखा फाडण्याचं काम परमबीर सिंह करत आहेत
परमबीर सिंह यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे सांगितले. तसेच अनेक गौप्यस्फोट देखील केले. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाविकास आघाडीच्या काळात वसुली कशी व्हायची ते काल सांगितलं. उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख, संजय राऊत तुम्ही खरंच मर्द असाल तर परमबीर सिंहसोबत नार्को टेस्ट घेऊन दाखवा. तुमचा बुरखा फाडण्याचं काम परमबीर सिंह करत आहेत .
उद्धव ठाकरेला ब्लॅक मेल करण्यासाठी सुशांत सिंह प्रकरणात फुटेज वापरले जाणार
महाविकास आघाडीचे नेते तेव्हा काय करायचे हे 90 टक्के बाहेर येईल. परमबीर सिंह यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंगच्या हत्येच्या काळात आयुक्त होते. तेव्हा जे घडलं ते सगळं त्यांना माहीत आहे. उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करण्यासाठी महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्याकडे ते फुटेज आहे, हेही आम्हाला माहिती आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरेला ब्लॅक मेल करण्यासाठी ते फुटेज वापरले जाणार, असेही नितेश राणे म्हणले.