पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीत भारताने इतिहास रचला आहे. आज गुरुवारी झालेल्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये (50 m Rifle 3P Men’s shooting) भारताचा नेमबाज स्वप्निल कुसाळे याने ब्रान्झ (कांस्य) पदक जिंकले. भारताचे पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीतील तिसरे पदक आहे. याआधी नेमबाजीत मनू भाकरने दोन तर सरबज्योत सिंगने एक कांस्यपदक जिंकले आहे. स्वप्निल कुसाळे याने एकूण ५९० गुणांसह सातवे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर एकूण ५८९ गुणांसह ११व्या स्थानावर राहिला होता. या फेरीतील टॉप 8 अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघात निवड झालेला स्वप्निल हा महाराष्ट्रातील एकमेव नेमबाज आहे. स्वप्निल कुसाळे हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील आहे. त्याने पुण्यातील बालेवाडीतील क्रीडा प्रबोधिनीमध्ये नेमबाजीचा सराव केला आहे.

अधिक वाचा  आमिर खान बनणार ‘कृष्ण’ बनेल, मग हा अभिनेता बनेल १८०० कोटींचा ‘अर्जुन’ ! ‘महाभारत’ची अशी योजना ऐकून राजामौलींनाही बसेल धक्का !

स्वप्निल कुसाळेने ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशनमध्ये पात्रता फेरीत सातव्या स्थानी झेप मारली आणि यामुळे त्याचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले होते. पात्रता फेरीतील पहिल्या आठ नेमबाजांना फायनलमध्ये थेट प्रवेश मिळतो, अशी या स्पर्धेची रचना आहे.

असा होतो सामना?

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकार स्पर्धेत आज अंतिम सामना खेळला. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन यामध्ये तीन प्रकारे नेमबाजी करावी लागते. पहिल्या प्रकारात गुडघे टिकण्याच्या स्थितीतून गुणांची कमाई करावी लागते. त्यानंतर प्रोन पद्धतीत अचूक लक्ष्यभेद करावा लागतो. आणि अखेर उभे राहून गुणांची कमाई करावी लागते.

अधिक वाचा  भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील युद्धबंदीनंतरची चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही

स्वप्नीलची पात्रता फेरीतील कामगिरी

कुसाळेने पात्रता फेरीत नीलिंग पोझिशनमध्ये १९८ (९९, ९९) अशी कामगिरी केली होती. त्यानंतर प्रोनमध्ये १९७ (९८, ९९) व स्टँडिग पोझिशनमध्ये १९५ (९८, ९७) असे वेध घेतले होते. पात्रता फेरीतील ४४ स्पर्धकांमध्ये त्याने सातवे स्थान प्राप्त केले आणि याच बळावर तो फायनलमध्ये पोहोचला. या इव्हेंटमधील फायनल आज गुरुवारी झाली.

पात्रता फेरीत चीनच्या लिऊ युकूनने ५९४ गुणांसह पहिले स्थान संपादन केले तर नॉर्वेच्या जॉन हर्मन हेगने ५९३ अंकांसह दुसरे स्थान मिळवले होते. युक्रेनचा सर्हिय कुलिश ५९२ गुणांसह तिसर्‍या स्थानी होता. फ्रान्सचा ल्युकास क्रिझिस व सर्बियाचा लॅझर प्रत्येकी ५९२ गुणांवर राहिला होता. पोलंडचा टॉमस्ज बॅर्टनिक ५९० गुणांसह सहाव्या स्थानी राहिला होता. कुसाळेने ५९० गुणांसह सातवे तर झेक प्रजासत्ताकचा जिरी प्रिवरटस्कीने ५९० गुणांसह आठवे स्थान मिळवले.

अधिक वाचा  ‘अमित शाह अपयशी गृहमंत्री’ त्यांना पुढची परिस्थिती हाताळणं शक्य नाही, त्यांना त्वरीत हटवा: शिवसेना नेते

स्वप्निलने यापूर्वी अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकवेळी पात्रता फेरीतील त्याची संधी अगदी काठावर हुकली होती.