मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोथरुड जनसंपर्क कार्यालयात विशेष मदत कक्ष; योजनेच्या लाभासाठी महिलांची उत्स्फूर्त गर्दी

राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर केली असून, कोथरुड मधील महिलांनाही या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. नामदार पाटील यांनी आपल्या कार्यालयात विशेष मदत कक्ष सुरू केला असून, कोथरुड मधील असंख्य महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नामदार पाटील यांच्या कोथरुड मधील कार्यालयात गर्दी केली आहे.

महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ मिळणार आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील सेतू आणि तहसील कार्यालयात महिलांनी मोठी गर्दी केली आहे. कोथरुड मधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना याचा लाभ घेता यावा, यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

नामदार पाटील यांनी आपल्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयात विशेष मदत कक्ष सुरू केला असून, या कक्षाच्या माध्यमातून महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्यासाठी आणि आवश्यक कागदत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत केली जात आहे. त्यामुळे कोथरुड मधील महिलांची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड मधील जनसंपर्क कार्यालयात मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

Hot this week

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते खाद्य उद्योजक अमित गोखले यांना “बिझिनेस एक्सलन्स पुरस्कार” प्रदान

पुणे : मराठी उद्योजकतेचा अभिमान ठरलेल्या खाद्य उद्योजक अमित गोखले यांना...

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

Topics

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे  :  सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img