खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पाणीसाठ्यात वाढ; पुणे शहरातील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात ४.२४ टिएमसी पाणी साठा झाला आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांमध्ये पाऊण टीएमसी पाणी वाढले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे शहरातील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, टेमघर, आणि वरसगाव या चारही धरणांतील पाणी साठा कमी होउन ३.५० टिएमसी झाला होता. मात्र गेल्या सहा दिवसांपासून खडकवासला धरण शेताच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झालेली आहे.

नदी, ओढ्यांमधून धरणात पाणी जात असल्याने जलसाठ्यात पाऊण टीएमसी वाढ झाली आहे. आता खडकवासला प्रकल्पात एकुण ४.२४ टिएमसी पाणीसाठा झाला आहे. पालखीसाठी कालव्यातुन ५०० क्युसेक्स पाणी साेडले आहे. पुणे महापालिका धरणातुन रोज १ हजार ७०० क्युसेक्स पाणी उचलत आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठयामध्ये पाउन टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे तूर्तास पाणी कपात केली जाणार नाही.

– नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग

Hot this week

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

Topics

तब्बल ४८ वर्षांनंतर केंदूर–पाबळकडे अध्यक्षपदाची संधी?

माजी सभापतींसह १४ सरपंच एकवटले; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत शिरूर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img