आषाढी एकादशीआधी पंढरपुरात मोठा अनर्थ टळला; चेंगराचेंगरीची दृश्य चिंतेत टाकणारी

आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त काही संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवलं आहे, तर पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मानाच्या आणि मोठ्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहेत. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेली असल्यामुळं अनेक भाविक पंढरपुरात येऊन विठ्ठलाचं दर्शन घेताना दिसत आहेत. इथं भाविकांची झालेली गर्दी पाहता एका मोठ्या संकटानं नुकतीच देवाच्या दारी चाहूल दिली आणि अनेकांनाच धडकी भरली.

बुधवारी पहाटेपासूनच विठ्ठल- रखुमाईच्या दर्शनासाठी मोठ्या भाविक दर्शन रांगेमध्ये उभे होते. सकाळच्या सुमारास या दर्शन रांगेमध्ये काही ठिकाणी बॅरिगेटिंग नसल्यामुळे भाविकांची गर्दी झाली आणि पुढे काही कळायच्या आतच रांगेच चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

मंदिर समितीचे एकही सुरक्षा रक्षक रांग लावण्यासाठी किंवा ती नियंत्रित करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे या ठिकाणी गर्दीच्या या वातावरणात भाविकांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. एकीकडे मंदिर समिती नव्या नव्या घोषणा करत असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे या प्रसंगामुळं समोर आलं आणि मंदिर प्रशासनाला ख़डबडून जाग आली.

Hot this week

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते खाद्य उद्योजक अमित गोखले यांना “बिझिनेस एक्सलन्स पुरस्कार” प्रदान

पुणे : मराठी उद्योजकतेचा अभिमान ठरलेल्या खाद्य उद्योजक अमित गोखले यांना...

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

Topics

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे  :  सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img