आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. टीम इंडिया विरुद्ध बांगलागदेश यांच्यात 22 जून रोजी सुपर 8 फेरीतील सामना होणार आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टीम इंडिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील दुसरा सामना आहे. टीम इंडियाने सुपर 8 मधील पहिला सामना जिंकल्याने आणखी एका विजयासह रोहितसेना सेमी फायनलमध्ये पोहचेल. मात्र दुसऱ्या बाजूला सुपर 8 मधील पहिला सामना गमावल्याने आता बांगलादेशची करो या मरो अशी स्थिती आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार म्हणाले, मुख्यमंत्री साहेब तुमचे चुकीच पाऊल पडतयं…तुम्ही अपयशी झालायं…

टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील 3 सामने जिंकले, तर 1 मॅच पावसामुळे रद्द झाली. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशने 3 सामने जिंकले. तर 1 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर टीम इंडियाने सुपर 8 मोहिमेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत विजयी घोडदौड कायम राखली. मात्र दुसऱ्या बाजूला बांगलादेश विजय मिळवण्यात अपयशी ठरली. बांगलादेशला ऑस्ट्रेलियाने डीएलएसनुसार 28 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे आता बांगलादेशला सुपर 8 मधील आव्हान कायम ठेवायचं असेल, तर कोणत्याही परिस्थितीत टीम इंडिया विरुद्ध जिंकावं लागणार आहे.

आकडे टीम इंडियाच्या बाजूने

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात 13 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने 13 पैकी 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 1 सामना बांगलादेशने विजय मिळवला आहे.

अधिक वाचा  रात्रंदिवस शिव्या मिळाल्यावर कसे वाटते…मुलांच्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी असे दिले उत्तर

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

बांग्लादेश क्रिकेट टीम: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), शकिब अल हसन, तॉहीद ह्रदोय, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, जाकेर अली, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम आणि सौम्या सरकार.