पुण्यात कोयता गँगला पोलिसांचा धाक उरला नाहीये हे पुन्हा एकदा समोर आलंय. काल सिंहगड रोडवर आता वडगावशेरीच्या गणेशनगर कोयता गँगची दहशत पहायला मिळाली. पुण्यात कोयता टोळीने पोलिसांच्या गाडीसह 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली. पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील गणेश नगरमध्ये ही घटना घडली. 6 कार, 4 रिक्षा, 3 दुचाकी आणि इतर वाहनांची कोयता गँगने तोडफोड केली. गुंडाने धुमाकूळ घालत कोयते आणि दगडांनी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

वडगावशेरीच्या गणेशनगर परिसरात काल कोयता टोळीच्या गुंडाने धुमाकूळ घालत हातामध्ये कोयते आणि दगड घेत वाहनांची तोडफोड करत वाहनांची तोडफोड केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. सलग पुण्यात दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाल्याने पोलिसांचा धाक उरला की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. कालच सिंहगड रस्त्यावरील क्रिकेट वाडी या ठिकाणी कोयता टोळीने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर मध्यरात्री चंदननगर परिसरातील वडगावशेरीत वाहनांची कोयता टोळीने तोडफोड केली आहे..

अधिक वाचा  ‘तारक मेहता…’ फेम सोनूला निर्मात्यांकडून कायदेशीर नोटीस ते बीअरबायसेपचं यू्ट्यूब चॅनेल हॅक

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर दहा ते पंधरा गुंडांचा तरुणावर हल्ला

पुण्यातील किरकटवाडी परिसरात काल संध्याकाळी 7.30 ते 9 च्या दरम्यान दहा ते पंधरा गुंडांनी हवेत कोयते फिरवून आणि दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या टोळक्याने नागरिकांना जखमी करण्याचा प्रयत्न केला असून या घटनेत दगड डोक्याला लागल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. हवेली पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेतलं असून यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्य आरोपी आणि इतर सात आरोपींवर कलम 307, 354,323, 324, 143 आणि इतर कलमांतर्गत हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अधिक वाचा  या देशात याकूब मेमनच्या दफनासाठी जागा मिळते, पण अक्षयला… आरोपीच्या वकिलाची खदखद काय?

पुण्यात कोयता गँगचा धुडगूस

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगचा धुडगूस पाहायला मिळतोय. गेल्या काही महिन्यांपासून गल्ली पासून दिल्लीपर्यंत एकच चर्चा पुण्यातील “कोयता गँग”. पुणे शहरातील अनेक भागात तरुणांच्या टोळ्या हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. खंडणी वसूल करणे, धमकावणे, दहशत निर्माण करण्यासाठी शहरातील अनेक भागात हे तरुण हातात कोयते घेऊन फिरताना दिसतायत. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहेच शिवाय व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता आहे.