छगन भुजबळ यांना सुट्टी नाही; मनोज जरांगे यांचा निर्वाणीचा इशारा

छगन भुजबळ यांनी मराठा आणि ओबीसीत वाद निर्माण केला. आता मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण करत आहे. दोन्ही समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे. आम्ही हे कधीच खपवून घेणार नाही, असं सांगतानाच आता छगन भुजबळ यांना सुट्टी नाही, असा निर्वाणीचा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मीडियाशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

छगन भुजबळांना सोडू शकत नाही. त्यांनी मराठा आणि ओबीसी वाद निर्माण केला आहे. आता धनगर आणि मराठ्यात वाद करत आहे. मी त्यांना सोडणार नाही. ओबीसींच्या इतर नेत्यांनी तरी असा जातीयवाद करू नये. बबनराव तायवाडे ज्येष्ठ आहेत. त्यांनी असं करू नये. तुम्ही भुजबळांच्या जवळ जा, नाही तर नका जाऊ. मला त्याचं घेणं नाही. पण तुम्ही चार पाच लोक न्यायाच्या बाजूने राहा. भुजबळांना धनगर आणि गरीब मराठ्यात वाद निर्माण करायचा आहे. संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला साडेचारशे जाती महत्त्वाच्या की महाराष्ट्र महत्त्वाचा आहे? हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे का? भुजबळांनी दोन पालकमंत्री जवळ ठेवले आहेत. आम्हाला काही फरक पडत नाही. वेळेला आम्ही दाखवून देऊ, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

भुजबळांना प्लान कळतो
छगन भुजबळ विनाकारण मराठ्याच्या विरोधात जात आहे. धनगरांवर आम्ही काय अन्याय केला? तुम्ही कशाला भुजबळांचं ऐकताय? दोन समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या छगन भुजबळ यांना आता सुट्टी नाही. आमचा प्लान काय? भुजबळांना कळतोय प्लान. मराठ्यांशिवाय पत्ता हलत नाही. त्यांना वेळेला कळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दोष काय?
मराठ्यांचा काय दोष आहे? भाऊ आहात म्हणता ना? उलट भुजबळांनी मोठं मन करायला हवं होतं. ते मराठ्यांचेही नेते झाले असते, असं सांगतानाच एकट्या येवल्यावाल्याचं ऐकून सरकारने वागू नये. नाही तर हाल होतील, असा इशारा जरांगे यांनी दिला.

आमच्या ताटातलं परत द्या
आमच्या ताटातलं कुणी काढू नये. आमच्या ताटातलं आम्हाला परत द्या. आमच्या ताटातलं हिसकावून घेऊन पळाले. अंधारात घेऊन पळाले. छगन भुजबळांनी किती विरोध केला तरी एकाही जातीच्या अंगावर जायचं नाही. एकटे भुजबळ हे करत आहेत. जातीयवाद करणं, वैयक्तिक मुद्द्यात घुसणं, या मागे भुजबळ आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Hot this week

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते खाद्य उद्योजक अमित गोखले यांना “बिझिनेस एक्सलन्स पुरस्कार” प्रदान

पुणे : मराठी उद्योजकतेचा अभिमान ठरलेल्या खाद्य उद्योजक अमित गोखले यांना...

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

Topics

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे  :  सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img