‘रामायणा’चा अपमान करणं आयआयटी-बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना महाग पडलं, चुकवावी लागली मोठी किंमत

रामायणाचा अपमान करणं IIT-Bombay च्या आठ विद्यार्थ्यांना चांगलच महाग पडलं आहे. आयआयटी-बॉम्बे विद्यार्थ्यांनी संस्थेच्या वार्षिक कला महोत्सवात 31 मार्च रोजी ‘राहोवण’ नावाच एक नाटक सादर केलं. ‘राहोवण’ हे रामायणावर आधारित नाटक होतं. यात रामायणाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला होता. IIT-Bombay ने या तक्रारीची दखल घेत आठ विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1.2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्रॅज्युएशनला असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1.2 लाख रुपये आणि ज्यूनियर विद्यार्थ्यांना 40 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तक्रारी मिळाल्यानंतर शिस्त पालन समितीची स्थापना करण्यात आली. त्यांनी केलेल्या शिफारशींच्या आधारावर संस्थेने ही दंडात्मक कारवाई केली आहे.

परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिव्हल हा आयआयटी-बॉम्बेचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. यावर्षी मार्चमध्ये हा फेस्टिव्हल झाला. त्यावेळी ओपन-थिएटरमध्ये ‘राहोवण’ नाटक सादर करण्यात आलं. काही दिवसात या नाटकातील काही क्लिप्स व्हायरल झाल्या. रामायणाचा संदर्भ असल्याने कलेच स्वातंत्र्य आणि धार्मिक भावना दुखावण यावरुन वादविवाद सुरु झाले. संस्थेकडे या विरोधात लिखितमध्ये तक्रारी करण्यात आल्या. एका तक्रारदाराने TOI शी बोलताना सांगितलं की, “‘राहोवण’ नाटक अनेक अंगानी अपमानास्पद वाटलं. विद्यार्थ्यांनी स्त्रीवादाच्या नावाखाली संस्कृतीची खिल्ली उडवली”

माहिती सोशल मीडियावर कशी लीक झाली?

विद्यार्थ्यांनी त्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक स्वातंत्र्याचा गैरवापर केला. यापुढे भविष्यात कॅम्पसमध्ये कुठल्याही धर्माचा अपमान होऊ नये, यासाठी संस्थेने मार्गदर्शकतत्व आखून द्यावीत असा एका सोशल मीडिया हँडलवर दावा करण्यात आला आहे. ही खूप कठोर कारवाई असल्याच काही विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. प्रेक्षक आणि परीक्षकांनी हे नाटक चांगल्या पद्धतीने स्वीकारल होतं, असं काही विद्यार्थ्यांच म्हणण आहे. IIT-Bombay च्या पदाधिकाऱ्यांनी यावर काहीही भाष्य केलेलं नाहीय. कारवाई संबंधीची गोपनीय माहिती सोशल मीडियावर कशी लीक झाली? या संदर्भात संस्थेने स्पष्टीकरण द्याव अशी मागणी एका दुसऱ्या विद्यार्थ्याने केली.

Hot this week

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते खाद्य उद्योजक अमित गोखले यांना “बिझिनेस एक्सलन्स पुरस्कार” प्रदान

पुणे : मराठी उद्योजकतेचा अभिमान ठरलेल्या खाद्य उद्योजक अमित गोखले यांना...

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

Topics

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे  :  सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img