अल्का याज्ञिक यांना आता कधीच ऐकू येणार नाही? काय म्हणाले डॉक्टर?

सर्वसामान्यपणे कोणत्याही व्यक्तीची श्रवणक्षमता वयानुसार हळूहळू कमी होत जाते. वयाची साठी किंवा सत्तरी ओलांडली की ऐकू येणं कमी होतं. मात्र काही प्रकरणांमध्ये एखाद्या आजारपणामुळे किंवा व्हायरल अटॅकमुळेही श्रवणक्षमता कमी होऊ शकते. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक यांना सध्या अशीच समस्या उद्भवली आहे. काही आठवड्यांपूर्वी विमानातून उतरल्यानंतर त्यांना अचानक ऐकू येणं बंद झालं. यानंतर त्यांना दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसचं (rare sensorineural nerve hearing loss) निदान झालं. व्हायरल अटॅकमुळे त्यांना ऐकू येत नसल्याचं डॉक्टर म्हणाले. पण यामुळे त्यांना पुन्हा पहिल्यासारखं ऐकू येईल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याविषयी तज्ज्ञ काय म्हणतायत, ते जाणून घेऊयात..

भारतातील कॉक्लियर इम्प्लांटचे जनक पद्मश्री डॉ. जेएम हंस हे याविषयी ‘टीव्ही 9 भारतवर्ष’शी बोलताना म्हणाले की अल्का याज्ञिक यांना आतासुद्धा ऐकू येऊ शकतं. त्यांनी सांगितलं की याबाबतीत अजूनही आशेचा किरण पहायला मिळू शकतो. “सर्वसामान्यपणे लोकांना असं वाटतं की एकदा ऐकू यायचं बंद झालं की पुन्हा श्रवणक्षमता पूर्ववत होत नाही. पण असं काहीच नसतं”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

उपचार शक्य आहे का?
आर्टिमिस रुग्णालयातील न्यूरो डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. सुमित सिंहने म्हणाले, “ही एक अशी समस्या आहे, ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या श्रवणक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. आपल्या कानाच्या आतील भागात जे पॅथॉलॉजी आणि कॉक्लियर नर्व्ह असतात, ते आपल्या मेंदूपर्यंत ऑडिओ सिग्नल पोहोचवण्याचं काम करतात. हे नर्व्ह डॅमेज झाल्यास ऐकू येणं बंद होतं. यावरील सर्वांत सहज आणि उत्तम उपाय म्हणजे सर्जरी. कॉक्लियर इम्प्लांटची ही सर्जरी केली जाते. यानंतर अवघ्या आठ ते दहा दिवसांत रुग्ण बरा होतो.”

लक्षणे कोणती?
सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉसची लक्षणं ही त्याच्या तीव्रता आणि स्थितीवर अवलंबून असतात. काही सर्वसामान्य लक्षणं पुढील असू शकतात.. – इतरांचं बोलणं समजण्यात अडचण – भुनभुनणारा किंवा घुमणारा आवाज – कानात सतत काहीतरी वाजल्यासारखं ऐकू येणं, गुंजणं किंवा हिसक्याचा आवाज – मोठा आवाज ऐकण्यात अडचण – संतुलनात समस्या

Hot this week

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

Topics

कॅम्प मुक्तिधाम येथे श्री शिव महाकालेश्वर मंदिरात भव्य महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : पुणे येथील कॅम्प परिसरातील मुक्तिधाम स्मशानभूमी...

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती...

तब्बल ४८ वर्षांनंतर केंदूर–पाबळकडे अध्यक्षपदाची संधी?

माजी सभापतींसह १४ सरपंच एकवटले; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत शिरूर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img