‘पुष्पा 2 : द रुल’ची रिलीज डेट पोस्टपोन, जाणून घ्या नवीन तारीख काय?

यंदाच्या वर्षातील बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक असलेला ‘पुष्पा 2 : द रुल’ची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, आता चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोन करण्यात आली आहे. चित्रपट निर्मात्यांनी नवी रिलीज डेटही जाहीर केली आहे.

‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट आता या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुष्पा-2 हा चित्रपट आता 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रिलीज डेटची माहिती दिली आहे. त्याशिवाय, रिलीज पोस्टपोन करण्याचे कारणही सांगितले आहे.

डिसेंबरमध्ये होणार रिलीज

पुष्पाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर रिलीज डेटची घोषणा करताना म्हटले की, आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट कलाकृती देणार. चांगल्या मनोरंजनासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करा. ‘पुष्पा 2: द रुल’ आता 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘पु्ष्पा 2’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे. पुष्पाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पहिल्या भागातील गाणी, हूकस्टेप्स लोकप्रिय झालेल्या. त्यानंतर आता त्याचा सिक्वेल पुष्पा 2 रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या टीझरने, गाण्यांना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.

पहिल्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

‘पुष्पा-पुष्पा’ या गाण्याच्या लिरिकल व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुनच्या स्टेप्सने चाहत्यांची मने जिंकली आहे. या गाण्यातील अल्लू अर्जुनच्या दमदार हुक स्टेपने ‘पुष्पाः द राइज’च्या पदार्पणापासूनच पॉप कल्चरचा एक भाग बनलेल्या ‘पुष्पाइझम’ची क्रेझ वाढवली आहे. ‘पुष्पा 2’ या गाण्याला युट्यूबवर 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आणि 2.26 मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. सहा भाषांमध्ये हे गाणे रिलीज झाले आहे.

भारतातील बिग बजेट चित्रपट

भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा 2’चा समावेश असणार आहे. ‘पुष्पा 2: द रूल’ हा ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाचा सीक्वेल असणार आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यामुळे आता हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Hot this week

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते खाद्य उद्योजक अमित गोखले यांना “बिझिनेस एक्सलन्स पुरस्कार” प्रदान

पुणे : मराठी उद्योजकतेचा अभिमान ठरलेल्या खाद्य उद्योजक अमित गोखले यांना...

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

Topics

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे  :  सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img