विधानसभेच्या ‘चक्रव्यूहा’स शरद पवारांकडून सुरुवात; आत्ता तातडीने हे करा, पदाधिकाऱ्यांना धाडला मोठा सांगावा

मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता शरद पवार कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी चक्रव्यूह रचायला सुरुवात केली आहे. त्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा सांगावा धाडला आहे. येत्या दोन दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढवू इच्छित असलेल्या विधानसभा जागांची माहिती शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मागवली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर शरद पवार गट विधानसभेच्या किती जागांवर दावा सांगणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तसेच मविआतील घटकपक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस हे पक्ष लढवू इच्छित असलेल्या विधानसभा जागांची माहितीही शरद पवार यांनी मागवून घेतली आहे. पुढील आठवड्यात मतदार संघनिहाय माहिती आल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडून 288 जागांबाबत चर्चा होणार आहे. त्यापूर्वी शरद पवार यांनी आपली जमिनीवरील सर्व यंत्रणा कामाला लावून विधानसभा मतदारसंघांच्या जागांबाबत इत्यंभूत माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. ही माहिती हाती आल्यानंतर शरद पवार विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखतील. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला नेत्रदीपक यश मिळाले होते. मविआने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 30 जागांवर  विजय मिळवला होता. शरद पवार यांच्या पक्षाने एकूण 10 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 8 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले तर सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता. शरद पवार गटाचा 80 टक्क्यांचा स्ट्राईक रेट ही पक्षासाठी जमेची बाजू मानली जात आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांचा अनुभव ही मविआसाठी जमेची बाजू ठरु शकते. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचाराच्या रणनीतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नियोजन अचूक ठरले होते. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतरच मविआला 30 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असे भाकीत केले होते. हे भाकीत जवळपास खरे ठरले आहे. लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे होईल आणि राज्यात सत्ताबदल अटळ असल्याचा ठाम विश्वास शरद पवार यांनी मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता.

Hot this week

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते खाद्य उद्योजक अमित गोखले यांना “बिझिनेस एक्सलन्स पुरस्कार” प्रदान

पुणे : मराठी उद्योजकतेचा अभिमान ठरलेल्या खाद्य उद्योजक अमित गोखले यांना...

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

Topics

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे  :  सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img