मातोश्री गृहनिर्माण हौसिंग सोसायटीचे चेअरमन, दाभोळे पंचशील सेवा मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४७६ चे संस्थापक व माजी अध्यक्ष मा. श्रीधर राघो कांबळे यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याने त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे आयोजन मातोश्री गृहनिर्माण हौसिंग सोसायटी आणि कांबळे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर तालुक्यातील देवरुख विभागाचे अध्यक्ष राजेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्री सभागृह येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दाभोळे पंचशील विकास मंडळाचे सरचिटणीस संतोष कांबळे यांनी गोड व लाघवी वाणीने केले, सदर प्रसंगी श्रीधर कांबळे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, वंचित बहुजन आघाडी, शिवडी विभात बौद्धजन पंचायत समिती कमिटी, श्रीधर कांबळे यांनी दोन पत्नी, दोन मूल, मुली, सुना आणि नातवंडे, संगमेश्वर तालुक्यातील गाव व मुंबई शाखा, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. बौद्धजन पंचायत समितीचे विश्वस्त आणि शिवडी गतक्रमांक १३ चे गटप्रमुख तथा जेष्ठ साहित्यीक राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी श्रीधर कांबळे यांना शुभेच्छा देत असताना “१९६५ साली श्रीधर कांबळे मुंबईत आले इथे त्यांनी खूप कष्ट केले, १९७४ साली ते बिटानियन मध्ये सर्व्हिसला रूजू होऊन जवळपास ३८ वर्षे प्रामाणिकपणे सर्व्हिस करून सेवानिवृत्त झाले त्यानंतर आजवर गाव आणि मुंबई भागात आंबेडकरी चळवळीचे जोमाने काम करत आपलं तन, मन, धन व निष्ठा राजगृहाला अर्पण करून कायमस्वरूपी आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ हा जीवनमंत्र त्यांनी आयुष्यभर जपला, त्याचसोबत संजय गांधी हिरवा पट्टा येथे लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी हिरीरीने चळवळीत सहभाग घेऊन आज तेथे मातोश्री गृहनिर्माण हौसिंग सोसायटीची निर्मिती करून जवळपास २२ वर्षे या गृहनिर्माण संस्थेचे काम करीत आहे” असे गुणगौरव करीत त्यांना मंगलकामना दिल्या त्याचसोबत माजी गटप्रमुख सीताराम कांबळे, मातोश्री गृहनिर्माण सोसायटीचे सचिव चंद्रकांत दाभोळकर, खजिनदार केसरकर आणि सोसायटीचे पदाधिकारी आदी मान्यवरांनी ही आपले मत व्यक्त करीत श्रीधर कांबळे यांनी ३० ते ४० वर्षात विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेत त्यांना सदिच्छा दिल्या. सरतेशेवटी दाभोळे पंचशील समितीचे चिटणीस संतोष कांबळे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  महाराष्ट्रात मान्सूनचे धुमशान; पुण्यात रेड अलर्ट या शाळांना सुट्टी पण मुख्याध्यापकांसह इतरांना ‘ही’ ड्युटी