मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंची पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्षपदावर निवड झाली. याच बैठकीतून राज ठाकरे हे मविआ, उद्धव ठाकरे आणि मोदींबद्दल सूचक बोलले. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केले आहे. महाविकास आघाडीला जे मतदान ते मोदींविरोधात झालेलं मतदान आहे. ते मतदान महाविकास आघाडीच्या प्रेमातून झालेलं नाही म्हणजे मोदींविरोधात जो रोष होता त्याविरोधात महाविकास आघाडीला जनतेने मतदान दिलं आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं. 

तर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव काढून घेतल्याने लोकांना ते पटलं नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणाही साधला आहे. यासह उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत असणाऱ्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांना आणू नका, कारण त्यांचा महाराष्ट्रात मोठा वर्ग आजही आहे, असं स्पष्टपणेही राज ठाकरे यांनी म्हटलं.

अधिक वाचा  महाराष्ट्र गुन्हेगारी रोखण्यात ३६ पैकी ३२ जिल्हे नापास; सामाजिक विकास केवळ 3 जिल्ह्यांना ५०%पेक्षा जास्त गुण