बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना ‘टक्कर’ देण्यासाठी अन् कार्यकारणीला पाठबळ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्यावतीने सुनेत्रा पवार राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली असून शरद पवार यांना शह देण्यासाठी मंत्रीपदीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रात फक्त 2 जागी विजयी झालेल्या भाजपाने पुण्याचे विद्यमान खासदार मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आल्यामुळे पवारांच्या बालेकिल्ल्यात आज भाजप वरचढ झाला आहे. ही गोष्ट अजित पवार यांच्यासाठीही मोठी अडचण आहे त्यामुळे सुनेत्रा पवार यांना सध्याच्या मंत्रिमंडळात मंत्री पदही मिळण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  झेपटो प्रकरणानंतर FDA ची डोकेदुखी वाढली – क्विक कॉमर्स कंपन्यांचे ‘डार्क स्टोअर्स’ शोधणे झाले आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मुंबईतील विधानभवनात पोहोचल्या आहेत. दरम्यान मंगळवारी 25 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी आज (दि.१३ जून) विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा बारामतीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला होता.

सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली सर्व राजकीय ताकद पणाला लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच महायुतीमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी कामाला लावले होते, मात्र सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाला.

अधिक वाचा  शार्दुल ठाकुरसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? शुभमन गिल नीतीश रेड्डीला ठेवणार का बाहेर?

लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे हर्षवर्धन पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्याशीही अजित पवार यांनी जुळवून घेतले होते. अशा परिस्थितीतही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्कादायक मानला जात आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना राजकीय टक्कर घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरची नियुक्ती केली जाणार असल्याचे मानले जात आहे.