महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान अजून व्हायचं आहे. त्यामुळे निकालाची उत्सुकता वाढू लागली आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात असून, महाविकास आघाडी आणि महायुतीत कोण सर्वाधिक जागा जिंकणार याबद्दल राजकीय विश्लेषकांची वेगवेगळी मते आहेत.
दुसरीकडे महायुतीचे नेते ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचे दावे करत आहेत. तर महाविकास आघाडीचे नेतेही ३० ते ३५ जागा जिंकणार असल्याचे म्हणत आहेत.
सहाव्या टप्प्यासाठी २५ मे म्हणजे, आज मतदान होत असून, ५८ लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. त्याचबरोबर सातव्या टप्प्यात असलेल्या लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा पाराही वाढला आहे.
महाराष्ट्रात मतदारसंघनिहाय झालेले मतदान –
पहिल्या टप्प्यातील एकूण मतदान – 63.71%
भंडारा -गोंदिया – 67.04%
चंद्रपूर – 67.55%
गडचिरोली-चिमूर – 71.88%
नागपूर – 54.32%
रामटेक – 61.01%
दुसऱ्या टप्प्यातील एकूण मतदान – 62.71%
अमरावती – 63.67%
नांदेड – 60.94%
यवतमाळ वाशिम – 62.87%
अकोला – 61.79%
बुलढाणा – 62.03%
हिंगोली – 63.54%
परभणी – 62.26%
वर्धा – 64.85%
तिसऱ्या टप्प्यातील एकूण मतदान – 63.55%
लातूर – 62.59%
बारामती – 59.50%
कोल्हापूर – 71.59%
रायगड – 60.51%
उस्मानाबाद – 63.88%
सांगली – 62.27%
सातारा – 63.16%
हातकणंगले – 71.11%
सोलापूर – 59.19%
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 62.52%
माढा – 63.65%
चौथ्या टप्प्यातील एकूण मतदान – 62.21%
बीड – 70.92%
जालना – 69.18%
छ. संभाजीनगर – 63.03%
पुणे – 53.54%
मावळ -54.87%
शिरूर- 54.16%
अहमदनगर – 66.61%
जळगाव – 58.47%
नंदूरबार – 70.68%
रावेर – 64.28%
शिर्डी – 63.03%
पाचव्या टप्प्यातील एकूण मतदान – 56.89%
धुळे – 60.21%
दिंडोरी – 66.75%
नाशिक – 60.75%
पालघर – 63.91%
भिवंडी – 59.89%
कल्याण – 50.12%
ठाणे – 52.09%
मुंबई उत्तर – 57.02%
मुंबई उत्तर-पश्चिम – 54.84%
मुंबई उत्तर-पूर्व – 56.37%
मुंबई उत्तर-मध्य – 51.98%
मुंबई दक्षिण-मध्य – 53.60%
मुंबई दक्षिण – 50.06%