एअर इंडियामधील 200 जणांनी आजारपणाची रजा घेतल्यामुळे 80 पेक्षा जास्त विमाने रद्द करावी लागली. यामुळे प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी फ्लाइटची माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेससमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. एअर इंडियाचे वरिष्ठ क्रू-मेंबर्सने एकाच वेळी सुटी घेतली आहे. एअर इंडियामधील 200 जणांनी आजारपणाची रजा घेतल्यामुळे 80 पेक्षा जास्त विमाने रद्द करावी लागली. यामुळे प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी फ्लाइटची माहिती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केबिन-क्रू कर्मचारी नसल्यामुळे अनेक विमानांची उड्डाने रद्द करावी लागली आहे. विमाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांना पूर्ण परतावा देण्यात येणार असल्याचे एअर लाईन्सकडून स्पष्ट करण्यात आले.
तिकीटाचे रिफंड पूर्ण देणार
टाटा ग्रुपची एअरलाईन्स एअर इंडियामध्ये संकट निर्माण झाले आहे. अनेक जणांना एकाच वेळी सुटी घेतल्यामुळे विमानांचे उड्डान रद्द करावी लागले. यासंदर्भात बोलताना एअर इंडियाचे प्रवक्ताने सांगितले की, आमच्या अनेक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सुटी घेतली आहे. त्यानंतर विमानांचे उड्डानांमध्ये उशीर होत आहे. काही विमाने रद्द करावी लागली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आमच्या क्रू मेंबर्ससोबत चर्चा करत आहोत. विमानांचे उड्डान रद्द झाल्यामुळे प्रवाशांना त्यांची तिकीटाचे पूर्ण रिफंड मिळणार आहे. तसेच कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आपला प्रवास रिशेड्यूल्ड करता येईल. तसेच बुधवारी विमानतळावर जाण्यापूर्वी एअरलाईन्सला संपर्क करुन फ्लाइटसंदर्भात माहिती घ्यावी, असे आवाहन विमान कंपनीने केले आहे.