धर्मशाला येथे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर काल चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्समध्ये सामना झाला. या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सने 168 या धावसंख्येचा यशस्वी बचाव केला. रवींद्र जाडेजा आणि तृषार देशपांडे या CSK बॉलर्सनी जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यामुळे हे शक्य झालं. पंजाब किंग्सने 9 विकेट गमावून 139 धावा केल्या. 28 धावांनी मिळवलेल्या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये CSK ची टीम पुन्हा टॉप 4 मध्ये आलीय. चेन्नईने मॅच जिंकली असली, तरी क्रिकेट पंडित मात्र, एमएस धोनीवर नाराज आहेत. जबाबदारी घेत नसल्याबद्दल त्यांनी एमएस धोनीवर टीका केली. IPL 2024 च्या सीजनमध्ये धोनीच्या बॅटिंग पोजिशनबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. धोनी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 224.49 त्या स्ट्राइक रेट आहे. मात्र, तरीही धोनी वरच्या स्थानावर फलंदाजीसाठी येत नाहीय.

अधिक वाचा  टीडीपी आणि जेदुयू बजेटपूर्वी मोठी निधीसाठी ‘फिल्डिंग’; विविध योजनांसाठी इतक्या हजार कोटींची मागणी

रविवारी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात धोनी करिअरमध्ये पहिल्यांदा 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याच्याआधी मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर आले. इरफान पठाणला हे पटलं नाही. कॉमेंट्री करणाऱ्या इरफान स्टार स्पोर्ट्सवर बोलताना यावर स्पष्ट शब्दात नापसंती व्यक्त केली. “दीर्घकाळाचा विचार करता, सीएसकेने प्लेऑफमध्ये प्रवेश केला, तर त्यांना या स्ट्रॅटजीचा फायदा होणार नाही” असं इरफान म्हणाला.

‘तो 42 वर्षाचा आहे हे मला माहितीय’

“एमएस धोनी 9 व्या नंबरवर बॅटिंगला येणार त्याचा सीएसकेला फायदा होणार नाही. तो 42 वर्षाचा आहे हे मला माहितीय. पण तो सॉलिड फॉर्ममध्ये आहे. त्याने वरती येऊन फलंदाजीची जबाबदारी घेतली पाहिजे. त्याने 4-5 ओव्हर फलंदाजी केली पाहिजे. तो एक किंवा दोन ओव्हर बॅटिंग करतो, दीर्घकाळाचा विचार करता, सीएसकेला त्याचा काही फायदा होणार नाही” असं इरफान पठाण म्हणाला.

अधिक वाचा  मराठा आरक्षण सर्वपक्षीय बैठक; मविआचा मात्र बहिष्कार ओबीसी नेत्यांची ही मोठी मागणी, मुख्यमंत्री काय निर्णय?

‘…तर त्याला टीममधून ड्रॉप केलेलच चांगलं’

“सीएसकेला त्यांचे 90 टक्के सामने जिंकायचे आहेत. ते प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतात. फॉर्ममध्ये असलेल्या सिनियर खेळाडू म्हणून धोनी वरती फलंदाजीला आला पाहिजे. त्याने आधी काहीवेळ असं केलय तसं करुन आता चालणार नाही” असं पठाण म्हणाला. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने सुद्धा संताप व्यक्त केला. “धोनीला खालच्या क्रमांकावर बॅटिंगला यायच असेल, तर त्याला टीममधून ड्रॉप केलेलच चांगलं” असं स्पष्ट शब्दात हरभजन म्हणाला.