लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून लोकशाहीचा मुडदा पाडला जात आहे. सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने केली जाणारी गणिताची जुळवाजुळव पारंपरिकभाजपा मतदारांना पचनी पडत नाही की काय अशी शंका सध्या निर्माण झाली आहे कारण दिवसेंदिवस जेष्ठ नेत्यांना येणारे मेसेज यातून भाजपाचाच मतदार नोटाकडे वर्ग होत असल्याचे धक्कादायक चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये पाहण्यास मिळत आहे. मुळात भारतीय जनता पक्ष थेट लढत देत असलेल्या ठिकाणी ‘नोटा’ला मतदान होण्याचे प्रमाण वाढत असताना ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नाही अशा ठिकाणी तर भयावह स्थिती आहे. उद्या रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले बहुसंख्य पश्चिम महाराष्ट्रात जागांवरती मतदान होत आहे परंतु यामध्ये भाजपा पक्षाचे चिन्ह नसलेल्या कोल्हापूर 2 बारामती रायगड धाराशीव या भागातील पारंपारिक मतदारांचा नोटाकडे कल वाढत आहे. त्यातच जाहीरपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना साथ द्या परंतु गद्दारीला राज मान्यता नको अशी घेतलेली भूमिका यामुळे नोटाची मते वाढण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिक वाचा  उत्खनन करताना सापडला अब्जोंचा खजाना, अधिकारी पळत आले घटनास्थळी, काय घडले नेमके? वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना सत्तेसाठी आणि सत्तेवर बसल्यानंतरही भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेली पक्षांची फोडाफोडी काही मनाला पटलेली नाही. हेच चित्र देशातही आहे. सुरतमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला माघारीस भाग पाडले. इंदूरमध्ये भाजपने काँग्रेस उमेदवार पळवला. महाराष्ट्रातही पूर्ण बहुमताचा सरकार असताना ज्यांच्यावरती आरोप केले त्याच नांदेड अन् बारामतीतील 2 वरिष्ठ नेत्यांना पक्षात घेऊन मुख्य आणि मानाच्या स्थानावर बसवलेलं या राजकारणामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि खदखद निर्माण झाली उद्या मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये हाच पारंपारिक मतदार कदाचित नोटा लाही मतदान करण्याची भीती सध्या भारतीय जनता पक्षाच्या गोटात वाढत आहे.

भारतीय जनता पक्षा मध्ये काम करत असताना सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्य अर्पित केलं आणि याच घराणेशाहीच्या लोकांच्या विरोधात लोकशाही करा घरात पोहोचवण्याचं कामही केलं. गेली दहा वर्ष सत्तेत राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्ष असतानाही या कार्यकर्त्यांकडे केलेले दुर्लक्ष मतदारांच्या तोंडी बाहेर पडत आहे आणि ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच घातल्या जाणाऱ्या पायघड्याही मतदारांना पत्नी पडत नाहीत त्यामुळेच की काय सध्या भारतीय जनता पक्षाची पारंपारिक वोट बँक स्थलांतरित होण्याची भीती आहे. कदाचित यावेळी इतर पक्षांना मतदान न करता ही वोट बँक नोटा हा पर्याय निवडेल अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि यातूनही भारतीय जनता पक्षाने काही सबक घेतली नाही तर हीच वाट बँक कुठल्यातरी एका समविचारी पक्षांकडे स्थलांतरित होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  ‘…तर गोपीनाथ मुंडेवर प्रेम करणाऱ्यांचा वेगळा पक्ष उभा राहील’, पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणात सांगितले

बारामतीमध्ये ‘नोटा’ला विशेष मते पडणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यापासून बारामती जिंकायचंय अशा अविर्भावात भारतीय जनता पक्षाने या लोकसभा मतदारसंघात बांधणी केली आणि मागच्या वेळी निसटता झालेला पराभव जिव्हारी लागल्याची भूमिका लक्षात घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये आपले योगदान बारामती बांधण्यास सुरुवात केली परंतु वरिष्ठ पातळीवरती झालेला निर्णय कार्यकर्ते आणि मतदारांना पचनी पडला असे वाटत नाही. ज्या नेत्यावरती बेंबीच्या देठापासून आरोप केले त्यांचं ओझे कार्यकर्त्यांच्या डोक्यावर दिलं हीच गोष्ट पारंपारिक मतदारांच्या पचनी न पडल्यामुळे जिथे भाजपाचे चिन्ह नाही त्या ठिकाणी नोटाला मतदान वाढण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  “तू मरणार आहेस का?”; रक्ताने माखलेल्या वडिलांना पाहून तैमुरने विचारला प्रश्न

बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड खडकवासला हे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेले विधानसभा मतदारसंघ अन् आणि गेली चार वर्ष इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील यांनीही भाजपाचं केलेलं काम पाहता यावेळी थेट कमळ विरुद्ध घड्याळ अशी लढत होण्याची शक्यता असतानाच राजकीय घडामोडीने या मतदारसंघाचं चित्र बदललेलं आहे. त्याचा फटका हा मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पवार यांच्या विरोधात या मतदारसंघात गेल्या वेळी सुमारे 5 लाख मते असल्याची जाहीर टिप्पणी करण्यात आली आहे.