टीम इंडियाचा स्टार खेळाडून विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याघरी बाळाचं आगमन झालं आहे. अनुष्कानं १५ फेब्रुवारीला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. पण अनुष्कानं आत्ता काही वेळापूर्वी स्वतः इन्स्टा पोस्टद्वारे ही आनंदवार्ता आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.

अनुष्कानं पोस्टमध्ये काय म्हटलं?

अनुष्का शर्मानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “मोठ्या प्रेमानं आम्हाला सांगायला आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी चिमुकलं बाळ ‘अकाय’चं अर्थात विमिकाच्या छोट्या भावाचं आम्ही या जगात स्वागत केलं. आमच्या जीवनातील या सुंदर काळासाठी आम्हाला तुमच्या सदिच्छांची अपेक्षा आहे. यावेळी आमच्या प्रायव्हसीचा तुम्ही आदर करावा, हीच माझी तुमच्याकडं विनंती”

अधिक वाचा  अंडर 19 आशिया कप 2024; कॅप्टन मोहम्मद अमानची नाबाद शतकी खेळी, जपानसमोर 340 धावांचं आव्हान

बाळाचं नाव केलं जाहीर

अनुष्कानं आपल्या बाळाचं नावही जाहीर केलं असून ‘अकाय’ असं नाव आहे. अनुष्कानं मुद्दाम हिंदी देवनागरीत हे नाव आपल्या पोस्टमध्ये लिहिलं. विराट आणि अनुष्काला विमिका नावाची एक मुलगीही आहे. त्यामुळं आता विमिकाच्या छोट्या भावाचं अर्थात अकायचं आगमन झाल्यानं आमचे कुटुंबिय खूप खूप आनंदात आहेत असंही अनुष्कानं म्हटलं आहे.