मराठा समाजासाठी शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणाचं विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या कायद्यावर आता उद्धव ठाकरे यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे. कायदा विधानभवनात एकमतानं मंजूर झाल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मराठा समाजाला सांगू इच्छितो ज्या ज्या वेळी हा ठराव समोर आला, त्या त्या वेळी एकमतानं मंजूर झाला. मला खात्री आहे की हे विधेयक कायद्याच्या चौकटीत टिकेल अशी आमची इच्छा आहे. मराठा समाजातील अनेकांना यासाठी बळी द्यावा लागला.

अधिक वाचा  कोल्हापूरमध्ये वेगळंच घडतंय! पक्षांची लक्तरेही बाजूला; 17माजी महापौर 228 माजी नगरसेवक यांच्या पाठिशी

ठाकरे पुढे म्हणाले, मी जरांगेंना जाऊन भेटलो, ज्या निर्घृणपणे निर्दयीपणाने आंदोलकांची डोकी फोडली त्याची आवश्यकता नव्हती. शांतपणे हा विषय सोडवता आला असता. मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा आणल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो.

दरम्यान, मराठा आरक्षणाचं विधेयक आज विशेष अधिवेशनात विधानसभेत सादर करण्यात आलं. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यामुळं मराठा समाजाला आता शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण मिळणार आहे.