मराठा आरक्षणासाठी मागील अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून सरकारसोबत लढा देणाऱ्या मनोज जरांगेंचा आज (13 फेब्रुवारी) मात्र तोल ढळला. मागील तीन दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत. मात्र, सरकारच्या वतीने त्यांच्या या उपोषणाची आणि मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नसल्याचं म्हणत जरांगेंनी थेट कॅमेऱ्यांसमोरच राज्य सरकारला अर्वाच्य शिवीगाळ केली आहे. आतापर्यंत मनोज जरांगे यांनी उपोषण, सभा, मोर्चे या माध्यमातून सरकारवर आरक्षणासाठी दबाव आणला होता. त्या-त्या वेळी सरकारने मनोज जरांगेंची समजूत काढत त्यांना उपोषण आणि मोर्चे मागे घेण्यास भाग पाडलं होतं. पण आता मात्र, जरांगेंना संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आता मराठा आरक्षणासाठी जे दोन दिवसीय अधिवेशन सरकारने बोलावलं होतं ते काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलं. ही बाब समजताच मनोज जरांगे यांनी कॅमेरा आणि शासकीय अधिकाऱ्यांसमोरच सरकारला तुफान शिवीगाळ केली. तसेच काही शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ मंडपातून जाण्यास सांगितलं.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले ते जसंच्या तसं…
‘तुला काय होतंय.. 50 वेळा सरकारच्या भाकरी खाऊन आलास.. आणि आमच्यासोबत लागला गोड-गोड गप्पा मारायला इकडे. तुम्हाला मराठे काय असतात हे 15-16 तारखेला दिसतील.. तुम्ही पण मजा लावलीय काय? इथे अंगात अन्न-पाणी नाही.. आग व्हायला लागली.. आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि हे आहे.. ऐ.. %!@$’
‘तुमचं सरकार आणि तुम्ही बी.. असली प्रक्रिया असते ओ.. ^%#%@$# .. तुमच्या बापाची प्रक्रिया आली का राष्ट्रपती राजवट उठवायला.. त्या मिरजमधल्या दंगलीतले गुन्हे कसे काय मागे घेतले रे तुम्ही…’
‘ते अजित पवारचे गुन्हे कसे काय मागे घेतले रे.. आमच्या याला प्रक्रिया सांगता.. आमचे गुन्हे आता मागे घेऊ नका.. आदेश काढा.. आम्हाला पण क्रॉस कम्प्लेंट घ्यायच्या आहेत. त्या घ्या राज्यभर.. जाऊ द्या दोन-तीन हजार पोलीस आतमध्ये आम्हालाही काही कामं नाही.. आम्हीही दोन-तीन हजार पोरं जातो मध्ये..’
’16 तारीख कसं काय घेतली तुम्ही? 15 दिवस हे 10 तारखेला होतात. नाही म्हणाले बदलू काही काही अडचण नाही.. मी म्हटलं ते पितृसत्ताक कशाला घेतलं रे.. मी एक व्याख्या देतो तर तुम्ही दुसरी घेतात.. मी सांगितलेली व्याख्या का घेत नाही सग्यासोयऱ्याची..’
‘आता म्हणतात 20 ला आहे अधिवेशन.. 31 मार्चला अधिवेशन.. तोवर सरकार राहील का? तुम्ही काय वेडे समजता काय?’
‘त्या शासनाच्या तर.. &%$*#@!$ मध्यस्थी करायची तर नीट करा नाही तर करू नका. इथे लोकं मरायला लागलेत उपाशी तपाशी.. ते जीआर कधीचा काढतायेत.. पाच महिन्यापासून..’
‘%#$@$@% राज्य चालवता का? काय संयम असतो समाजाला.. आम्हाला पण संयम आहे. पाच-सात महिने दिलेत तुम्हाला.. तुम्ही काय मराठा जातीला वेड्यात काढायला निघाले का?’
’31 मार्च काय त्याच्या बापाने केलं का… त्याच्या #%@$$@%^@ कोण ते @!#%^@% पाच महिने काय काढत होते.. ह्यायचा… $#%@&*%@ त्यांच्या..’
‘कशाला आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले रे ते… परत सांगता प्रक्रिया सुरू आहे.. मध्यस्थी करायची तर नीट करा नाही.. मारून टाकतील मराठे तुम्हाला रस्त्यावर गाठून तुम्हाला..’
‘दोन दिवसात अधिवेशन घेणार आहे म्हणे.. घेतलं का? कशाला बोलायला लावता रे आम्हाला.. मध्यस्थी तुम्ही तात्पुरते आहात. जीव चाललाय आमचाय.. जातात त्यांच्या विमानात बसून आणि फुकत माघारी येतात त्यांच्या भाकरी खाऊन.. समाजाचे म्हणून.. डबल रोल करू नका..’
‘त्या चिवट्या आणि तुम्ही.. डबल रोल करू नका.. आम्ही भरवसा ठेवला म्हणजे आम्ही काय नालायक #%@^&$& नाहीत.. बोललं तसं करत जा.. घेतलं का दोन दिवसात अधिवेशन? मारता का आमचे लोकं?’
‘बघतो तुम्ही कसं अधिवेशन पुढं घेता आणि कशी अंमलबजावणी करत नाही ते…’
‘हैदराबादचं गॅझेट घ्यायला तुम्हाला पाच महिने लागतात का? सगेसोयरेची अंमलबजावणी केली तर मी उपोषण कायमचं सोडतो. तुम्ही गुन्हे सगळे मागे घ्या आजच्या आज… मी कायमचं आंदोलन बंद करतो. तुम्हाला वाटतं का मराठे पुन्हा मुंबईत घुसणार नाहीत? आता जर घुसले ना… आता जर घुसले तर ठप्प तर लांबच राहिलं.. तिसराच लोचा होईल..’
‘आमच्या पाच-सहा मागण्या आहेत त्या पूर्ण होत असतील तर या इकडे नाही तर नका येऊ 15-16 तारखेला पाहूयात.. सरकार किती ताकदवान आहे ते मराठे बघतील..’
‘तुम्ही काय मोठेपणा सांगता काय.. तुमचं वजन सरकारपाशी वाढण्यासाठी.. गुन्हा मागे घेतला काय? शेण खातो काय इथे मी.. उठा इथून.. अरे उठा इथून.. फसवता का मराठ्याला..’
‘बसा शांत थोडावेळ.. डोकं दुखायला लागलं माझं.. व्हा तिकडं… बसा तिकडे.. आलात 15 दिवसातून एकदा अन् आले तुकराम महाराज आणि काही सांगायला.. कळतं मला सगळं संत वैगरे सगळं कळतं मला.. व्हा मागे तिकडे.. आतापर्यंत झोपले होते काय? इतके दिवस मध्यस्थीला आले नाही आणि आता आले बरोबर.. तुमचं सगळं टोळकं आहे मध्यस्थीवाल्यांचं..’
असं म्हणत मनोज जरांगेंनी त्यांचा राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. मात्र यावेळी त्यांचा संपूर्णपणे तोल ढळल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता या सगळ्याबाबत शिंदे सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.