महाराष्ट्रात झालेले सत्तांतर…. मराठा आरक्षण…. आमदारा पात्रता…. राष्ट्रवादी कोणाची?…. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघाच्या दुस-या महाअधिवेशनात दिलखुलास मुलाखतीत प्रकट मुलाखत ही खरी महाराष्ट्रासाठी पर्वणीत होतीच अन् त्यास अजित पवारांनी पुन्हा बिनधास्त…. रोकठोक अन् धोरणात्मक विचारसरणीने दिलेल्या चतुरस्त्र उत्तराने अजितदादांचे अनोखे पैलू उघड झाले. अन् चांद्यापासून बांद्यापर्यंत जमलेल्या डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघाच्या दुस-या महाअधिवेशनातील मुलाखतीच्या सुरुवातीलाच मराठीचे रोकठोक अभिनेते गिरीष कुलकर्णी यांनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच स्पष्ट अन् रोकठोक प्रश्न विचारला अन् मुलाखत खुलण्यास सुरुवात झाली!

अधिक वाचा  महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटला, ‘या’ दिवशी जाहीर होणार पहिली यादी

सध्या महाराष्ट्रात अजित पवार यांना कायम टिकेला सामोरे जावे लागत असताना त्यांचीही भूमिका काय? त्यांनी संपूर्ण पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर महायुतीत का समाविष्ट केला? महाराष्ट्राच्या आगामी वाटचालीमध्ये कोणती ध्येयधोरणे स्वीकारली पाहिजेत सध्या कोणत्या गोष्टी चुकत आहेत या सर्व गोष्टींचा आढावा घेत दिलखुलास अजिदादांनी आपलं व्यक्तिमत्व राज्याचे विकासासाठी किती कटिबद्ध आहे याची जाणीव करून दिली.

DMEJ महाअधिवेशन उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रकट मुलाखत-

https://www.youtube.com/live/yKfCD995yXU?si=MztHjnZmkxwfy4cM

महाराष्ट्र राज्यातील शेकडो डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि चॅनल्सच्या प्रतिनिधीचे कोल्हापूर कणेरीमठ येथे दुसरे महाअधिवेशन श्रीमंत शाहू महाराज, उच्च तंत्रज्ञानमंत्री चंद्रकांत पाटील खा.धनंजय महाडिक, खा.धैर्यशिल माने व डॉ.ओमप्रकाश शेटेंच्या उपस्थित मान्यवरांनी अधिवेशनाचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटनाच्या कार्यक्रमात डिजिटल पत्रकारांनी कोणती ध्येयधोरणे अन् नवी दिशा ठरविण्यासाठी मान्यवरांनी मते व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांच्या कुटुंबहितासाठी योग्य दिशादर्शक नियोजन करण्याचा कानमंत्र दिला अन् नव्या प्लॅटफॉर्म च्या पत्रकारांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तर श्रीमंत शाहू महाराज मालोजीराजे यांनी महाअधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांना महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा  लाडकी बहीण अडचणीत!? ”फुकटच्या योजना प्रतिज्ञापत्र सादर करा” हायकोर्टाचे राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश

दुपारच्या सत्रात “कृत्रिम बुद्धिमत्ता” विषयावरील परिसंवादात chatt gpt अन् नव्याने येऊ घातलंले AI तंत्रज्ञांनावर ‘विचार मंथन’ करण्यात आले. AI हे तंत्रज्ञान डिजीटल मिडियासाठी वरदान असून या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. अधिवेशनाच्या समारोपाला अभिनेते गिरीश कुलकर्णीच्या प्रश्नांना अजितदादांनी दिली रोखठोक उत्तरे यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला अजिदादांची ध्येय धोरणं कळली.

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा मानेंच्या मार्गदर्शनाखाली सातारा, कोल्हापुर, इचलकरंजी विभागातील पदाधिकारी यांनी वाखण्याजोग नियोजन करत डिजिटल मिडिया संपादक पत्रकारांचे ऐतिहासिक अधिवेश पार पाडले.