अंबिका मसाले घराघरात पोहोचवणाऱ्या कंपनीच्या सर्वेसर्वा कै. कमल परदेशी यांना डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्र तर्फे ‘अंबिका मसाले’ यांना महागौरव पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांचे शुभहस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे. महाराष्ट्र महागौरव व डिजीटल स्टार महागौरव पुरस्कार २०२४ वितरण केले जाणार आहे.

कमल परदेशी यांनी २००० साली बचत गटातील शेतमजूर भूमिहीन महिलांना एकत्रित करत सुरू केलेल्या मसाले व्यवसाय त्यांनी अंबिका मसाले हा ब्रँड तयार केला. स्वतः निरक्षर असूनही त्यांनी आपल्या मसाल्याचे मार्केटिंग जगभरात केले. आपल्या मसाला उत्पादन कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या हाताला काम देत अंबिका मसालेची कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. कमल परदेशी यांनी आपल्या झोपडीतूनच मसाल्याच्या  उद्योगाची  सुरुवात केली होती. आता त्यांचे मसाले भारतातील लहान मोठी दुकाने तसेच मोठमोठ्या मॉलसोबतच परदेशी बाजारपेठांतही विकले जातात. कै. कमल परदेशी यांच्या पश्चात सध्या नलिनी गायकवाड या व्यवसायाची धुरा सांभाळत असून गेली ती वीस वर्ष कमल परदेशी यांच्याबरोबर त्यांनी याच व्यवसायात काम केले आहे. महिला बचत गटांना नव्या समस्यांना सामोरे जावे लागत असताना नलिनी गायकवाड या नव्या बाजारपेठेचा अभ्यास करून यामध्येही महिला बचत गटांचा उत्पादन कसं वाढवता येईल यासाठी काम करत आहेत आगामी काळात अंबिका मसालेची वाटचाल त्यांच्याच खांद्यावर आहे.

अधिक वाचा  अविरत पक्षनिष्ठा अन् कायम जनसेवेचा वसा! आनंद उर्फ बंडूशेठ तांबे यांची जन्मदिनी ही ‘सेवा दिंडी’ सुरुच!

कमल परदेशी यांचा शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल असलेल्या अंबिका मसाले कंपनीच्या  चेअरमन असा थक्क करणारा प्रवास आहे. आदर्श उद्योजिकासहित अनेक पुरस्कारांनी गौरव जर्मनीच्या चांसेलार अँगेला मर्केल यांनीही कमलताईंच्या कामाचं कौतुक केलंय. शेतमजूर असणाऱ्या कमलताई परदेशी यांनी मजुरीच्या पैशातून मसाला व्यवसाय सुरू केला. कमल परदेशी यांनी बचत गटाच्या माध्यमातून अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना मसाले बनविण्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.

कमल परदेशी व महिलांनी सुरुवातीला पुण्यातल्या सरकारी कार्यालयाबाहेर मसाले विकले. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबईतल्या प्रदशर्नांमध्ये आणि मग बिग बाझारमध्ये मसाल्यांची विक्री केली. अंबिका मसाल्यांना देशभरात मागणी आहे. जर्मनीतही त्यांच्या मसाल्यांना मोठी मागणी आहे.