पाणी पुरवठ्याविषयी ७ जुलै २०२३ रोजी पाणी पुरवठ्याविषयी तक्रार प्राप्त झाली आणि प्रभाग १० चे सक्रीय नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी संबंधित प्रश्न तातडीने पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी केली आणि केवळ पाहणीवर न थांबता सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु केला, मात्र संबंधित विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद प्राप्त झाला नाही यावर पाऊल उचलण्याच्या उद्देशाने मागील आठवड्यात मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभाग यांना निवार्णीचा/आंदोलनाचा इशारा दिला याची दखल घेऊन पाणी पुरवठा विभागाने त्वरित कार्यवाही सुरु केली यावेळी स्वतः नगरसेवक दिलीप वेडेपाटील स्वत: त्याठिकाणी उपस्थित होते.

या परिसराला मागील ६ ते ८ महिन्यांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करून देखील या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. येथील रहिवासी नागरिक नियमित कर भरत असून देखील अश्या प्रकारे पाण्यासारख्या मुलभूत गोष्टीपासून ते वंचित राहिले. बावधन आणि कोथरूड मधील काही विशिष्ट भागाला पाणी पुरवठा करणारी टाकी चांदणी चौकात असून देखील या परिसराला हक्काचे पाणी मिळाले नाही.

अधिक वाचा  मोठी बातमी! आनंदाचा शिधा योजना अखेर बंद

पाण्यासाठी या रहिवासी इमारतींनी खूप सहकार्य करून देखील अत्यंत कमी दाबाने व अत्यंत कमी पाणी मिळते आहे. बावधन आणि कोथरूड परिसरात बहुतांश सोसायट्यांना पाण्याचे मीटर असून देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक कृती आणि उत्तरे आजपर्यंत मिळाली नाहीत. सदर पाणी प्रश्न इतका गंभीर आहे की येथील रहिवासी इमारतींना हक्काने टँकर देखील मिळाला नाही, एवढा अन्याय होऊन देखील येथील नागरिकांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्यच केले आहे. पाण्याच्या या गंभीर प्रश्नाबाबत नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या कार्यालयाकडून पाणी पुरवठा विभाग, पुणे मनपा, कोथरूड – बावधन क्षेत्रीय कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार केला गेला.

पाणी प्रश्नाबाबत पूर्ण अवलोकन केले असता बावधन आणि कोथरूड परिसराला पाणी पुरवठा करणा-या चांदणी चौकातील टाकीची पातळी ३.५ मीटर पेक्षा जास्त राखून या परिसराला सकाळी ५:०० ते १०:०० या वेळेत पाषाण किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी पाणी न सोडता बावधन आणि कोथरूड परिसराला पाणी सोडल्यास सर्व सोसायट्यांना योग्य दाबाने आणि योग्य प्रमाणात पाणी मिळेल असा निष्कर्ष निघाला. याबाबत आज दि: १५ जानेवारी २०२४ रोजी चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीजवळ आमदार मा.श्री.भिमराव अण्णा तापकीर, पुणे मनपा आयुक्त मा.श्री. विक्रम कुमार तसेच मा.श्री.नंदकिशोर जगताप – मुख्य अभियंता, मा.श्री.श्रीधर कामत – कार्यकारी अभियंता, मा.श्री.योगेश देवकर – उप अभियंता, मा.श्री.नरेंद्र परदेशी – कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा विभाग, पुणे मनपा, तसेच प्रभाग १० चे नगरसेवक दिलीप अण्णा वेडेपाटील, किरण दगडे पाटील, अल्पनाताई वरपे, डॉ.श्रद्धा प्रभुणे, मा.श्री.गणेश वरपे, भाजपचे पदाधिकारी यांच्यासह बावधन – कोथरूड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत ‘इंडिया’च्या खेळाडूंची छाप वरुण चक्रवर्तीचा धमाका 16 स्थानांची उडी घेत या क्रमांकावर विराजमान

सदरचा पाणी प्रश्न अत्यंत गंभीर असून पाण्यासाठी प्रभाग १० बावधन – कोथरूड परिसरातील नागरिकांनी लाखो रुपये टँकरवर खर्च होत असल्याची माहिती आमदार भिमराव अण्णा तापकीर आणि नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी आयुक्त साहेब आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. पाहणी दरम्यान आमदार मा.श्री.भिमराव अण्णा तापकीर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याबाबत पुणे मनपा आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली यावर आयुक्तांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील तसेच चांदणी चौक येथील टाकीमध्ये आवश्यक पाणी पातळी कायम ठेवण्याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदेश दिले.

अधिक वाचा  कसबा पेठेत एका म्यानात दोन तलवारी प्रवेश करताच धंगेकरांचा आमदार रासनेंवर प्रहार, थेट या मुद्यावरुन छेडले

तसेच वूड्स रॉयल परिसरातील सोसायट्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्पुरते बुस्टर लाऊन पाणी पुरवठा करण्याचे व त्या परिसराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र टाकी बांधण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार भिमराव अण्णा तापकीर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या सूचनेनुसार आयुक्तांनी संबंधितांना दिले.