अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची जोरात तयारी सुरु आहे. रिपब्लिकन पक्षाकडून त्यांनी उमेदवारीची पहिली शर्यत जिंकली आहे. सलग तिसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात. ट्रम्प यांचा दणदणीत विजय झालाय. भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी पराभवानंतर स्वत:च राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी ट्रम्प यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. अयोवामध्ये सोमवारी रात्री 1500 पेक्षा जास्त ठिकाणी मतदान झालं.
लोवामध्ये मतदारांनी मोठा उत्साह दाखवला. लोवाच्या मतदानावर सगळ्यांच्या नजरा होत्या. ट्रम्प यांच्या विजयानंतर डेमोक्रॅट्सना झटका लागण स्वाभाविक आहे. लोवामध्ये विजयानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांनी सेलिब्रेशन केलं. ट्रम्प यांना बायडेन यांच्या आव्हानाचा सामना करावा लागेल असं मतदानापूर्वी बोलल जात होतं. पण असं झालं नाही. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना 51 टक्के मत मिळाली.
भारतीय वंशाच्या रामास्वामी यांना किती मत मिळाली?
फ्लोरिडाचे गवर्नर रोन देसांतिस 22,781 मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. रोन यांना 21.2 टक्के मत मिळाली. दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गवर्नर निक्की हेली तिसऱ्या स्थानावर राहिल्या. निक्की यांना 19.1 टक्के मत मिळाली. लोवामध्ये निवडणूक लढवणारे भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांचा दारुण पराभव झाला. ते चौथ्या स्थानावर राहिले. रामास्वामी यांना फक्त 7.7 टक्के मत मिळाली. लोवामधील या पराभवानंतर रामास्वामी राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
ट्रम्प यांनी भारतीय उमेदवाराबद्दल काय म्हटलेलं?
लोवामध्ये मतदानापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी रामास्वामी यांच्यावर जोरदार टीका केली होती. ट्रम्प यांनी रामास्वामीला ठग म्हटलं होतं. आपल मत रामास्वामी यांच्यावर वाया घालवू नका असं मतदारांना अपील केलं होतं. विवेक छळ-कपटाने अभियान चालवतोय, असा आरोप ट्रम्पनी केला होता. लोवानंतर न्यू हॅम्पशायर, नेवादा आणि दक्षिण कॅरोलिनामध्ये मतदान होणार आहे. तिथे रिपब्लिकन पार्टीच्या प्रदर्शनावर नजर असेल.