पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.. ‘डंकी’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तो इतका दमदार असेल असं वाटलं नव्हतं. मात्र शाहरुख खानने आपल्याच डायलॉगने ही गोष्ट सिद्ध केली आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करण्यास कलाकार का इतके उत्सुक असतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. पंजाबमधील एका गावात राहणाऱ्या काही मित्रांना लंडनला जायचं असतं. तिथे गेल्यानंतर आपली गरीबी मिटेल असं त्यांना वाटत असतं. त्यातल्या एकाला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला सोबत घेऊन जायचं आहे. तिला तिच्या पतीकडून सतत मारहाण होत असते. हे सर्व मित्र IELTS च्या परीक्षेची तयारी करतात, मात्र त्यांना इंग्रजी भाषा येत नाही. त्यानंतर हे डंकी फ्लाइट म्हणजेच अवैध पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करतात. या प्रवासादरम्यान काय काय घडतं, त्याची कथा चित्रपटात पहायला मिळते.

अधिक वाचा  आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी महामार्ग पॅचवर्क व डांबर कोट्यावधीचा घोटाळा? 4आठवड्यात उत्तर द्या नोटीस जारी

कसा आहे चित्रपट?
शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत मजेशीर आहे. त्यातील एकही सीन रटाळवाणं वाटत नाही. संपूर्ण चित्रपटादरम्यान तो प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवतो. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कथेचा प्रवाह अत्यंत योग्य आहे. कधी ही कथा तुम्हाला हसवते, कधी रडवते तर कधी थक्क करते. चित्रपटात शाहरुख हा मोठा कलाकार असला तरी इतर प्रत्येक कलाकाराला समान संधी मिळाली आहे. त्यामुळे कोणीच कोणावर वरचढ ठरत नाही. एक-एक भूमिका प्रेक्षकांशी एक नातं जोडू पाहते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहू शकता.

अधिक वाचा  अजितदादांचा काँग्रेसला मोठा दणका; ‘स्थानिक’च्या निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये ताकद वाढणार; दोन बडे नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

अभिनय
या चित्रपटात शाहरुख पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग ठरला आहे. त्याचसोबत इतरही भूमिकांना स्क्रीनवर आपली छाप पाडण्यासाठी पुरेशी संधी मिळाली आहे. चित्रपटात तरुणपणीचा आणि म्हातारपणीचा.. असे दोन शाहरुख पहायला मिळतात. म्हातारपणातील शाहरुखचा मेकअप आणखी चांगला होऊ शकला असता, पण कथेच्या प्रवाहात ती गोष्ट तितकी महत्त्वाची वाटत नाही. अभिनेत्री तापसी पन्नूने नेहमीप्रमाणे दमदार काम केलं आहे. शाहरुखसोबत तिची जोडी खूप चांगली वाटते. म्हातारपणाच्या भूमिकेत तिनेही कमाल अभिनय केला आहे.