क्षमता असूनही शरद पवार हे शेवटच्या क्षणी माघारी फिरतात. पंतप्रधानपद हाताशी येतानाही ते माघारी फिरले. हा त्यांचा स्वभाव अजूनही समजत नाही, असं सांगत प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे इतिहासात कितीदा संधी असून ते माघारी फिरले याचा पाढाच वाचून दाखवला…..

१) शरद पवार पहिल्यांदा २००४ मध्ये भाजपसोबत जाणार होते. प्रमोद महाजन आणि आम्ही एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली. दिल्लीत माझ्या घरी ही बैठक झाली, असं पटेल म्हणाले आहेत. अडवाणी वाजपेयी यांच्या सूचनेनुसार ही मिटींग झाली होती. या बैठकीबाबत गोपीनाथ मुंडे खूप आनंदी होते. पण प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. शरद पवार यांचे राज्यात राजकीय वजन वाढेल म्हणून प्रमोद महाजन यांना हे नको होतं. आपले वरिष्ठ शरद पवार यांच्या सोबत जातील तर महाराष्ट्रातल वजन कमी होईल, ही भीती प्रमोद महाजन याना होती. म्हणून महाजन यांनी ही बातमी बाळासाहेब ठाकरेंकडे लीक केली. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करणे सुरु केले. यामुळे भाजप शरद पवार यांची जवळीक होऊ शकली नाही, असाही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले.

अधिक वाचा  महाकुंभला महागर्दी ! प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन बंद; शेकडो किलोमीटर रांगा, ४३ कोटी भाविकांचे स्नान

२) सीताराम केसरी अध्यक्ष असताना १४० खासदार हे शरद पवार यांच्यासोबत होते. यावेळी देवेगौडा हे पंतप्रधान झाले होते. केसरी यांच्या स्वभावाला कंटाळून देवेगौडा राजीनामा देणार होते. त्यानी शरद पवार याना पंतप्रधान होण्यासाठी निरोप पाठवला. देवेगौडा आणि १४० खासदार एकत्र असूनही पवार ऐनवेळी माघारी फिरले. हे मला अजूंपर्यंतही समजले नाही, असंही ते म्हणाले.

३) 2019 मध्ये गडकरी यांच्यासोबत आमची बैठक झाली. यावेळी पवार यांनी ऐनवेळी भाजपसोबत जायचे नाही, हा निर्णय घेतला. उद्भव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक फिस्कटली होती. शरद पवार हे बैठकीतून निघून गेले. पवार साहेब जाताना मला अजित पवार याना सांगून गेले तुम्ही काही निर्णय घ्या. त्या दिवशी अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधीस भाजप सोबत गेले. असंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

अधिक वाचा  धनंजय मुंडे गोत्यात! मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव

पटेल म्हणाले, ”माझे शरद पवार यांच्याशी वैयक्तिक वाद नाहीत. पण आमची राजकीय भूमिका शरद पवार यांच्या विरोधात आहे. आता आपण सगळे अजितदादा यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मी शरद पवार सोबत होतो, आता कायम स्वरूपी अजित पवार यांच्यासोबत आहे.

माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत भविष्यात मी देखील पुस्तक लिहिणार आहे. त्यावेळी मी माझी बाजू मांडेल. येथे दिलीप वळसे पाटील देखील बसले आहेत. त्यांच्या देखील पोटात खुप काही दडलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी पोटात साठवल्या आहेत. आपल्या पक्षाचा प्रवास केवळ विधानसभा लोकसभापर्यंत नाही, पुढील २० ते २५ वर्ष अजित पवार यांच्या नेतृत्वखाली काम करायचं आहे हे देखिल पटेल यांनी स्पष्ट केले.