पूणे शहरात कोयता गँगमुळे वाढणारी दहशत त्यातून होणारे खून सत्र मोडून काढणे हे पुणे शहर पोलीसांपुढे खूप मोठे आवाहनात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. ते आवाहन पुणे शहर पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून आवाहन स्विकारत कोयता गँगच्या दहशतीला संपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि तशाप्रकारे त्यांच्या कारवाईला सजग नागरिकांच्या सहकार्याने यशही येत आहे. कोथरूड – बावधन क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत डहाणूकर कॉलनी आरोग्य कोठीवर घडलेल्या प्रसंगावरून पोलीसांच्या चाणाक्ष कामगिरीचा प्रत्यय आला. पण त्यांच्या कामगिरीचा दोन सफाई कामगारांना नाहक रोशाला बळी पडण्याची वेळ आली. त्यात पोलीस अधिकाऱ्यांचीही चूक नाही आणि दोन सफाई कामगांराची काही चूक नाही पण मोकादम वैजीनाथ गायकवाड यांना “मा. नगरसेवक शाम देशपांडे यांची डहाणूकर कॉलनीतील रस्ता क्रं. १८ वरील स्व. रामदासजी कळसकर पथ यांच्या नामफलकासमोर एक झुडूप वाढून ते नाव झाकले आहे. तेवढे वाढलेले झुडूप व गवत तोडून नाव दिसेल असे सफाई करून घ्या” अशी तक्रार आली. सदरच्या तक्रारीवरून दोन सफाई कामगांराना ती तक्रार दूर करण्यास सांगीतले. त्यामुळे सदर झुडूप तोडण्यासाठी त्या सेवकांना कोयता घेऊन जाण्यास सांगीतले त्यानुसार त्यांनी दुपारी १२.३० वाजता आरोग्य कोठीतून कोयता हातात घेऊन त्यांच्या दुचाकीवरून तक्रारीच्या ठिकाणी जाऊन काम केले.
पण त्यांच्या दुचाकीवरून कोयता घेऊन जाताना पाठीमागे बसलेल्या कामगांराने तो कोयता झाकून घेऊन न जाता उघड्यावर हातात धरून घेऊन गेल्याचे सी.सी. कॅमेऱ्यात फुटेजमध्ये दिसून आले. त्यामुळे पोलीस आयुक्त कार्यालयातून सदर कोयता घेऊन गेल्याचा व्हि.डी.ओ. फुटेज आला आणि सदर आरोपीला पकडा असा आदेश अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेश तटकरे यांना आदेश आला. त्या आदेशान्वये पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, गुन्हे अन्वेषण विभागाचे आशिष राठोड व पोलीस कर्मचारी निशिकांत सावंत यांनी सदर फुटेज वरून मोकादम यांच्याशी संपर्क साधून तो व्हि.डी.ओ. फुटेज पाठवून चौकशी सुरु केली. सदर घटनेची माहिती समजताच झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब दांडेकर व मोकादम वैजीनाथ गायकवाड हे अलंकार पोलीस स्टेशनमध्ये आले आणि तो फुटेज पाहून यांनी सदर तपास अधिकाऱ्यांना असे सांगितले की, ” सदर कोयता घेऊन जाणारे कोयता गँगचे दहशत निर्माण करणारे आरोपी नसून ते महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आहेत”. अशी माहिती दिली असता त्यांना पोलीस स्टेशन मध्ये ओळखीची चौकशी करण्यासाठी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले त्यामुळे सदर सेवकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
त्यामुळे सदर सेवकांनी “असे प्रसंग कोणत्याही सफाई कामगांरावर येऊ नये अशा प्रतिक्रिया दिल्या “भितीने घाबरून गेलेल्या सफाई कामगांराना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण व आशिष राठोड यांनी त्या सफाई सेवकांना तुमचे काम करण्याचे “कोयते, कु-हाडी, गवत काढण्यासाठी वापरात असलेल्या तलवारी उघड्यावर घेऊन जाऊ नका तर ती हत्त्यारी झाकून घेऊन जा जेणेकरून नागरिक भितीपोटी पोलीस स्टेशनला तक्रार देणार नाहीत त्यातून सफाई कामगार पोलीसाच्या कारवाईला नाहक रोशाला बळी ठरणार नाहीत. तसेच महानगरपालिकेने अशा हत्यारांची नोंद त्या त्या पोलीस स्टेशनला द्यावी आणि सदर हत्याराने केलेल्या कामाची नोंद व छाया चित्रे काढून ठेवावी.
तसेच सदर कामे करत असताना सफाई कामगारांनी आपला गणवेश व ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे शिवाय सफाई कामगांराच्या कामाचे कौतुक करून शाब्बासकीही दिली. सदर घटनेची माहिती संदीप कदम, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन यांना माहिती दिली असता असे आदेश दिले की,” सर्व महापालिका आयुक्तांनी कायम व कंत्राटी सेवकांना गणवेश व ओळखपत्र परिधान करण्याच्या सुचना द्या अन्यथा सक्त दंडात्मक कारवाई करा” तसेच महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे व आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे यांना दिली असता ,” वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेश तटकरे यांच्या सुचनांचे तंतोतंत पालन केले जाईल शिवाय कामावर असताना सफाई कामगांरानी गणवेश व ओळखपत्र परिधान करण्याच्या सुचनाही दिल्या. तसेच कंत्राटी कामगांराना देखील संबधीत ठेकेदारांनी ओळखपत्र देण्याचे आदेश दिले आहेत.”