मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे नवी मुंबईत भव्य मोठ्या परमात स्वागत करण्यात आले. जरांगे पाटील यांचे भाषण ऐकण्यासाठी बाहेर मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. त्यांच्या भाषणाला मोठी प्रमाणात गर्दी जमली. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी ‘खूप वर्षांपासून मराठे आरक्षणासाठी लढाई करत आहेत. इथे आलेला प्रत्येक माणूस टाईपपास, काम नाही म्हणून सभेसाठी येऊन बसला नाही तर वेदना घेऊन बसला आहे असे म्हणाले. मराठ्यांचा विश्वासाने घात केला. प्रत्येकाने सांगायचे मराठ्यांच्या नोंदी नाहीत. 70 वर्षांपासून मराठ्यांना आरक्षण होतं. पण जाणूनबुजून दिले नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मराठ्यांना आरक्षण देऊ नये यासाठी इतर नेत्यांचा दडपण होते. मराठ्यांना खात्री लायक माहिती मिळाली होती. प्रत्येक वेळेस मराठ्यांची निराशाच होत गेली. संघर्ष प्रचंड केला. 70 वर्ष त्यांच्या बुडाखाली असलेले पुरावे बाहेर निघत नव्हते. मराठा 50 टक्क्यांच्या आत obc मध्ये आहे. सरकारने मराठ्यांच्या नोंदी सापडून काढलाय आहेत. त्यावेळी आरक्षण दिलं असतं तर आज आयएएस, आयपीस सारख्या मोठ्या पदावर मराठा तरुण बसला असता. एक ही नेता आमच्या लेकराचे अश्रू पुसायला येत नाही. लेकरू आणि बाप एकमेकांचा चेहरा पाहत नाही. 95 टक्के पडून मुलगा घरी बसतो अशी आमची व्यथा असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांनी स्वप्न बघायचे नाही आणि बघितलं तर ते पूर्णही करू द्यायचे नाही असा विडाच काही नेत्यांनी उचलला आहे. मराठ्यांच्या नोंदी सापडायला लागला हाच मराठयांचा विजय आहे. आपला गाडीत ऑइल ओतल्यासारखा खेळ आहे. कुणाच्या मागे लागल्यावर आपण काही सोडत नाही. एक मंत्री माझ्याकडं आला. त्यांना माझी भाषा कळत नाही ते अधिकाऱ्यांना विचारतात त्यांनाही कळलं की ते मला कॉल करतात. कोणता मंत्री आपल्याकडे दुसऱ्यांदा येत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
काही म्हणतात आरक्षण देऊ नका. पण, तुमची कोणती जात आरक्षण घेऊन आली? एक भाऊ खुश आणि एक नाराज हे मी बघू शकत नाही. समितीला राज्याचा दर्जा द्यावं लागले हे सांगितलं आणि आज आपल्या लेकरांच्या पदरात भाकरी पडायला लागली याचा आनंद आहे. महाराष्ट्र सदनात 63 कोटी रुपये एकट्याने घालवले. महाराष्ट्रसाठी समिती काम करते याचे लाखाने पुरावे सापडले. जेवताना तिथे काही गप्पा चालतात. ते आम्हाला सांगणारे तिथे अर्धे आहेत. ते म्हणतात लढा. मराठा समाजाच्या वेदना मांडतो म्हणून तर मला शत्रू मानतात, अशी टीका त्यांनी मंत्री भुजबळ यांच्यावर केली.
मी शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे मला काही दम निघत नाही. मी स्वतःहून कोणावर आरोप केला नाही. टीका केली नाही. पण मराठा आरक्षणामध्ये कोणी आला तर वाजवलाच. मी गप्प बसलो ते मराठ्यांच्या लेकरासाठी. आपले गनिमी कावे सरकारला समजू देत नाही म्हणून तर 70 टक्के लढाई जिंकलो आहे. गप्प बसलो ते लेकरांसाठी. संयम धरला तर मराठ्यांचा सुवर्णक्षण आहे. सुवर्ण क्षण जवळ आला आहे. त्यामुळे सयंम धरला पाहिजे. हे आपल्याला उचकवणार आहे. आपली जात रागीट आहे त्यामुळे यांचा डाव त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.