ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फे करण्यात आलं आहे. पोलीस कॉन्स्टेबल नाथा काळे व अमित जाधव अशी बडतर्फे पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पुणे पोलीस आयुक्तांनी सोमवारी दोघांच्याही बडतर्फीचे आदेश काढले आहेत. ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केली, असा आरोपी दोघांवरही आहे.

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेला ललित पाटील याला उपचारासाठी ससुन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी पोलीस कॉन्स्टेबल नाथा काळे आणि अमित जाधव या दोघांकडे सोपवण्यात आली होती.

अधिक वाचा  आंबेडकर-भुजबळ ‘ओबीसी आरक्षण बचाव’साठी एकत्र?;  राज्यभर यात्रा फिरणार छगन भुजबळ यात्रेसाठी निमंत्रित

दोघेही ड्युटी करीत असताना ललिल पाटील १ ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून पळून गेला होता. पोलिसांचा कडक पहारा असूनही ललित पाटील रुग्णालयातून पळालाच कसा? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन्ही पोलिसांचं निलंबन करण्यात आलं होतं.

इतकंच नाही, तर दोघांना अटकही करण्यात आली होती. अटकेपासून दोन्ही पोलीस कर्मचारी जेलमध्येच होते. आता त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी सोमवारी याबाबतचे आदेश काढले आहे. दुसरीकडे ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांच निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी समितीला दोषी आढळलेल्या या दोन्ही डॉक्टरांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे.