मुंबई: विश्वचषक 2023 चा अंतिम सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने विश्वविजेत्या पदावर नाव कोरलं. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामन्याची लढत झाली. पण ज्या विश्वचषकासाठी सारा अट्टाहास सुरु केला होता, त्या विश्वचषकाचा अपमान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केला असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस याने मिचेल मार्शचा एक फोटो सोशल मीडिया हँन्डलवरुन शेअर केला. त्याच फोटोनंतर क्रिकेट फॅन्समधून संताप व्यक्त केला जाऊ लागला. या फोटोमध्ये मिचेल मार्श हा विश्वचषकावर पाय ठेवून बसला असल्याचं पाहायला मिळत आहे.

पॅट कमिंस याने शेअर केलेल्या या फोटोमुळे क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये बराच रोष पाहायला मिळाला. तसेच चाहत्यांकडून सचिनचा विश्वचषकासोबत देखील फोटो शेअर करण्यात आलाय. ज्याची तुलना मार्शच्या या फोटोसोबत केली जातेय. सचिनने या फोटोमध्ये विश्वचषकाच्या ट्रॉफीला जवळ घेतल्याचं पाहायला मिळत आहे. पंरतु मिचेल मार्शकडून मात्र या ट्रॉफीचा अपमान झाल्याचं चाहत्यांनी पाहिलं. त्याच्या एका हातामध्ये बियर आणि त्याचे दोन्ही पाय विश्वचषकाच्या ट्रॉफीवर या फोटोमध्ये आहेत.

अधिक वाचा  अंतरिम अर्थसंकल्पात नवीन घोषणाबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या…

मिचेलच्या फोटोवर चाहत्यांचा संताप

विश्वचषकाची ट्रॉफी सहाव्यांदा उचलल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ट्रॉफीला जवळ घेत फोटो शेअर केले. पण मिचेल मार्शच्या या फोटोने मात्र ऑस्ट्रेलियांच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठलीये. ऑस्ट्रेलियाने 2023 चा विश्वचषक जिंकला.पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने अंतिम फेरीत भारताचा पराभव केला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली. मात्र, सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शच्या हातात बिअर आणि त्याचे पाय विश्वचषकावर आहेत. मिचेल मार्शच्या या लज्जास्पद कृत्यामुळे क्रिकेट चाहते संतापले होते. मिचेल मार्शवर क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर टीका केली.

अधिक वाचा  ललित पाटील प्रकरणी महिला PSIसह दोघे बडतर्फ; चौकशीत दोषी आढळल्याने ४ जणांची थेट हकालपट्टी

विश्वचषकाचा अंतिम सामना

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. भारताकडून रोहित शर्माने 47 धावांची शानदार खेळी केली. रोहितची खेळी पाहता भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते. पण हे होऊ शकले नाही. रोहितचा अप्रतिम झेल ट्रॅव्हिस हेडने घेतला आणि सामना बदलला. कोहलीने 54 धावांची खेळी खेळली असली तरी त्याची अर्धशतकी खेळी मोठ्या सामन्यात फार काही करू शकली नाही.

याशिवाय केएल राहुलने 66 धावांची खेळी केली, भारताने 240 धावा केल्या होत्या. यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने डावाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या 3 विकेट लवकर पडल्या पण यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि लॅबुशेन यांनी 192 धावांची भागीदारी करून भारताला सामन्यातून बाहेर काढले. भारताने हा सामना 6 विकेटने गमावला. ट्रॅव्हिस हेडला त्याच्या शतकी खेळीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.