साऊथ अभिनेता धनुषच्या मुलावर पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी धनुषचा मुलगा यात्रावरपोलिसांनी कारवाई केलीय. काय आहे प्रकरण जाणून घ्या.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी धनुषचा मुलगा यात्राला दंड ठोठावला असल्याची माहिती समोर आली आहे.

चेन्नईच्या पोस गार्डन परिसरात यात्राला सुपरबाईक चालवत असलेला एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे. त्याच्यासोबत एकगाईड असुन तो त्याला बाईक चालवण्यासाठी मार्गदर्शन करतोय.

धनुषचया मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये यात्राने हेल्मेट घातले नव्हते आणि त्याच्या दुचाकीचीनंबर प्लेट दिसत नव्हती. याशिवाय, यात्राकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं. ज्यामुळे यात्राकडून नियम मोडले गेले. आणि चेन्नई वाहतूकपोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलीय.

अधिक वाचा  भाजपाचे हॅट्रिकचे ‘मिशन’ अन् ‘इंडिया’चे हे आव्हान; 350 उमेदवारीची रणनिती अन् जागांचे गणित काय?