ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राऊत यांनी कसिनोतला  एक फोटो शेअर करून भाजपला डिवचलं होतं. या आरोपावर उत्तर देताना भाजपकडूनच संबंधित व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याची पुष्ठी केली होती. कसिनोतल्या या फोटोवरून राजकारण तापले असतानाच आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: समोर येऊन यावर खुलासा केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

राऊतांनी शेअर केलेल्या त्या फोटोवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर असल्याचे सुरुवातीला बावनकुळे सांगतात. तसेच या हॉटेलच्याच ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो आहे. त्यामुळे जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो, त्यावेळी कुणीतरी काढलेला हा फोटो असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे स्पष्ट करतात.

अधिक वाचा  भाजपाचे हॅट्रिकचे ‘मिशन’ अन् ‘इंडिया’चे हे आव्हान; 350 उमेदवारीची रणनिती अन् जागांचे गणित काय?