मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ प्रहार संघटनेकडून मातृतीर्थ सिंदखेड राजा शहरातील सावता भवन याठिकाणी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. प्रहार संघटनेचे व आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलन राज्यभर चर्चेत राहतात दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली “एक थेंब रक्ताचा प्रामाणिक योद्धा साठी” रक्तदानाचा महायज्ञ पार पडला आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा प्रामाणिक व सात्विक माणूस कधीच पाहिला नाही. त्यांनी निस्वार्थपणे आंदोलन सुरू ठेवले आहे, त्यांना साथ म्हणूनच प्रहार संघटने रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांना पाठिंबा दिला असल्याचे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

अधिक वाचा  ठाकरे गटाने दाखवलेल्या ई मेल आयडीवरुन शिंदे गटाच्या अडचणी वाढणार?

दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतले. शहरातील सावता भवन येथे आयोजित महायज्ञ रक्तदान शिबिराला उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी आमदार बच्चू कडू बोलताना यांनी सांगितले की, सरकारकडून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे आरक्षण मागण्याची वेळ आली आहे. शेतमालाला योग्य भाव मिळाला असता तर आरक्षण मागण्याची वेळच पडली नसती. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने कधीच उभे राहिले नाही त्याचा परिणाम असा झाला की प्रत्येक जातीतील नागरिकांना वाटू लागले की आता आरक्षणाशिवाय पर्याय नाही. मागील ७५ वर्षाचे पाप आपल्या माथी मारले आहे. आम्ही रक्त सांगण्यासाठी आलो नाही तर रक्तदान करण्यासाठी आलो असल्याचे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

अधिक वाचा  आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ; दिशा सालियान प्रकरणी सरकारकडून ठाकरेंची SIT चौकशी

यावेळी बुलढाणा जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्यासह शेकडो युवकांनी रक्तदान केले. रक्तदानासाठी बुलढाणा, जालना, अकोला येथील रक्तपेढी दाखल झाल्या होत्या. यावेळी शेकडो प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले यावेळी प्रहार संघटनेचे पदाधिकारी व नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान पिढीचे डॉ.दिगंबर मेहत्रे, विनोद झगरे, पूजा बनकर गणेश वायाळ अनिल घोडेस्वार सुखदेव गायकवाड संदीप खरात यांच्यासह इतर रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते.

आमदार बच्चू कडू यांचे स्थानिक प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले.यावेळी समाज कल्याण अधिकारी मनोज मिरज,तहसीलदार सचिन जैस्वाल,गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.