क्रिकेटचा देव म्हणून संबोधला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवारी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

यावेळी दस्तुरखुद्द सचिनसह त्याचे कुटुंबीय, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, खजिनदार आशिष शेलार आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. एकूण २२ फूट उंचीचा असलेला सचिनचा हा पुतळा सरळ दिशेने हवेत फटका मारतानाच्या शैलीत आहे. विजय मर्चंट स्टँड आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मधोमध हा पुतळा बसविण्यात आला असून संपूर्ण पुतळा ब्राँझचा आहे.

अधिक वाचा  राम मंदिराच्या उद्घाटनासाठी VVIP पाहुण्यांना निमंत्रण, सचिन, विराट, अंबानी आणि… पाहा Guest List

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती ब्राँझच्या पुतळ्याचे बुधवारी वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांनी अनावरण केले. या कार्यक्रमानंतर सचिन तेंडुलकरने वानखेडे स्टेडियमवरील आपल्या पहिल्या भेटीची मजेशीर आठवण सागितली. ‘मी दहा वर्षांचा असताना पहिल्यांदा वानखेडे स्टेडियमवर आलो होतो आणि तेव्हा मला लपवून आणण्यात आले होते,’ अशी आठवण सचिनने सांगितली.

सचिनने यंदा एप्रिलमध्ये वयाचे अर्धशतक पूर्ण केले. त्याचा सन्मान करण्यासाठी एमसीएने वानखेडे स्टेडियमवर पूर्णाकृती पुतळा स्थापन केला. यावेळी सचिनच्या कुटुंबीयांसह क्रीडामंत्री संजय बनसोडे, आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, खजिनदार आशिष शेलार आणि एमसीएचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  राष्ट्रवादी कोणाची युक्तिवाद संपला सुनावणी पूर्ण!; निवडणूक आयोगाचा ‘हा’ मोठा निर्णय अन् हे आदेश

सचिन म्हणाला, ‘वानखेडेवरील माझी पहिली भेट मजेशीर होती जी कोणाला माहीत नाही. १९८३च्या विश्वचषकानंतर वेस्ट इंडीज संघ भारत दौऱ्यावर आला होता. तो सामना पाहण्यासाठी मी मोठा भाऊ आणि त्याच्या मित्रांसह वानखेडे स्टेडियमला आलेलो. आमची जागा नॉर्थ स्टँडमध्ये होती. परतताना कोणीतरी म्हटले की, ‘झालं ना मॅनेज व्यवस्थित.’ आम्ही २५ जण होतो आणि तिकीट २४ होते. सर्वांनी मला लपवून आतमध्ये नेले होते. आज याच स्टेडियमवर स्वत:चा पुतळा पाहणे अभिमानास्पद आहे.’ यावेळी सचिनने भारतीय संघाचे कर्णधारपद तंदुरुस्तीमुळे नाकारून महेंद्रसिंग धोनीकडे का सोपविण्यास सांगितले, याची आठवणही सांगितली.

अधिक वाचा  अदानींची सर्वाधिक कमाई! मस्कलाही टाकले मागे; 24 तासात 1,91,62,33,50,000 रुपये कमावले

माझ्या व्यस्त वेळापत्रकात या कार्यक्रमाच्या निमित्ताने आनंदाचा क्षण अनुभवता आला. भारतरत्न सचिन तेंडुलकरचा एकेरी उल्लेख होता कामा नये. मात्र आपण आपल्या जवळच्या व्यक्तींचा उल्लेख एकेरीत करतो. देवाचाही उल्लेख एकेरीत करतो आणि सचिन तर क्रिकेटचा देव आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल वाटणारी जवळीक वेगळी आहे. ज्या स्टेडियमवर सचिनने अनेक क्षण अनुभवले, त्याच मैदानावर तो आता पुतळ्याच्या रूपाने कायम राहणार आहे.