भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यप्रदेशमध्ये यंदा पक्ष नेतृत्वासमोर प्रस्थापितविरोधी लाटेचे मोठे आव्हान असेल. राज्यामध्ये खरी लढत ही भाजप आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसमध्ये असली तरीसुद्धा आम आदमी पक्ष (आप) आणि बहुजन समाज पक्ष (बसप) यांनीही काही भागांमध्ये मोठे आव्हान उभे केले आहे.

मध्यप्रदेशात २००३ मध्ये ३८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने २०१८ मध्ये ११४ जागा जिंकत निसटता विजय प्राप्त करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते. पण पक्षाचे हे सत्तास्वप्न २०२० मध्ये भंगले होते. केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी समर्थक आमदारांसह कमळ हातात घेतल्याने सगळेच चित्र बदलले होते.

राज्यात पुन्हा भाजपला सत्ता मिळाली होती. आता काँग्रेसने भ्रष्टाचार, रोजगार, शेतकरी आत्महत्या, आदिवासी, महिलांच्या प्रश्नावरून वातावरण तापवायला सुरूवात केली आहे. कर्नाटकमधील विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून पक्ष मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात आक्रमक प्रचार करू शकतो.

अधिक वाचा  राष्ट्रवादी माजी आमदार तुकाराम बिडकरांचे अपघाती निधन विदर्भातील राष्ट्रवादीचा माळी समाजाचा मोठा चेहरा हरपला

मोदींचाच चेहरा

भाजपकडून निवडणूक प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच चेहऱ्याच वापर करण्यात येईल, भाजपच्या राजवटीत झालेल्या विविध गैरव्यवहारांवरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. उज्जेनमधील ‘महाकाल लोक’च्या उभारणीतील मुद्दा काँग्रेसने लावून धरला असून भाजपच्या अठरा वर्षांच्या राजवटीमध्ये २५० पेक्षाही अधिक मोठे गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ‘व्यापमं’ गैरव्यवहाराच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत.

भाजपकडून आतापर्यंत प्रचारामध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या चेहऱ्याचा वापर केला जात होता. पक्षाने याखेपेस मात्र रणनीतीमध्ये बदल करताना तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांना मैदानात उतरविले आहे. सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या शिवराजसिंह यांच्याविरोधातील लाट मोडीत काढण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो.

अधिक वाचा  शरद पवार यांना भाजपकडून धक्का? अनेक वर्षे शरद पवारांसोबत असलेला नेते भाजपमध्ये जाणार

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांचे काय होणार?

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत २०२० मध्ये भाजपत प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर त्यांच्या समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्याचे मोठे आव्हान असेल. अर्थात शिंदे समर्थकांना उमेदवारी दिल्यास भाजपचे जुने नेते आणि कार्यकर्ते नाराज होण्याचा धोका आहे. काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचे नाव पुढे केले असून भाजपने मात्र त्यांच्याकडे शिवराजसिंह यांच्यासारखा लोकप्रिय नेता असताना देखील त्यांचे नाव मात्र पुढे केलेले नाही.

-: भाजपसमोरील आव्हाने :-

प्रस्थापितविरोधातील तीव्र लाट

दलित, महिलांवरील वाढते अत्याचार

चित्ता प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील अपयश

अधिक वाचा  भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार? गिरीश महाजनांचा मोठा खुलासा

शेतकऱ्यांच्या समस्या, विजेची अन् बियाण्यांची टंचाई

राज्यातील तरुणांमधील वाढती बेरोजगारी

मोडकळीस आलेली आरोग्य, शिक्षण व्यवस्था

-:काँग्रेसमोरील आव्हाने:-

प्रभावी संघटनेचा अभाव

ज्योतिरादित्य शिंदेंची अनुपस्थिती जाणवणार

राज्यातील ६६ जागांवर पक्षाची ताकद कमी

सत्ताधाऱ्यांकडे असलेला मोदींसारखा प्रबळ नेता

दिल्लीने उतरविलेली केंद्रीय नेत्यांची फौज

‘आप’, ‘एमआयएम’सारखे नवे पक्ष

एकूण जागा – २३०

एकूण मतदार – ५.६ कोटी

पुरुष मतदार – २.८८ कोटी

महिला मतदार – २.७२ कोटी

१८- १९ वयोगट – २२.३६ लाख