दिल्लीत अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरु आहे. या बैठकीला अजित पवार अनुपस्थित राहिले आहे. इतकंच नाही तर देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची बैठक सुरु आहे. या बैठकीला देखील अजित पवार गैरहजर राहिले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज तब्येतीच्या कारणास्तव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले.या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. एकीकडे दिल्लीत अमित शहांसोबत शिंदे-फडणवीसांची बैठक सूरू असताना, महाराष्ट्रात अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली.त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार मुख्यमंत्री शिंदेंवर नाराज असल्याच्याही चर्चा आहे. त्यात आता दिल्लीतील अतिमहत्वाच्या या बैठकीत अजित पवार का अनुपस्थित होते? याची माहिती आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तुटकरे यांनी दिली आहे.
दिल्लीत अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरु आहे. या बैठकीला अजित पवार अनुपस्थित राहिले आहे. इतकंच नाही तर देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची बैठक सुरु आहे. या बैठकीला देखील अजित पवार गैरहजर राहिले आहेत. या बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी माध्यमांसमोर येऊन बैठकीतला तपशील सांगितला. अजित पवार प्रकृती अस्वास्थतेमुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. तसेच या बैठकीत मतदार संघनिहाय आढावा घेतल्याचे देखील तटकरे यांनी सांगितले.
दिल्लीतील शिंदे-फडणवीस सोबतच्या बैठकीला अजित पवार गैरहजर होते. यावर सुनील तटकरे म्हणाले, शिंदे फडणवीस यांची दिल्लीतली भेट नियोजित होती की नाही याची मला माहिती असण्याचे कारण नाही. पण प्रकृती ठिक नसल्यामुळे दादा सहभागी झाले नसल्याचे तटकरे यांनी यावेळी म्हटले.
विशेष म्हणजे गणेशोत्सवात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते. मात्र तेच अजित पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला पोहोचले होते. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री शिंदेशी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.या नाराजीच्या चर्चेवर सुनील तटकरे म्हणाले, विरोधकांचा कल्पोकल्पीत जाणीवपुर्वक अफवा पसरवण्याचा प्रयत्न सूरू आहे. पण महायुतीमध्ये असलेले घटक पक्ष एकजूटीने काम करताय. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एक दिलाने काम करत असल्याचे तटकरेंनी यावेळी स्पष्ट केले.
दिल्लीतल्या अमित शहांसोबतच्या बैठकीत अजित पवार गटाचा एकही नेता उपस्थित नव्हता.यावर तटकरे म्हणाले, ज्यावेळेला वरीष्ठ पातळीवर चर्चा होते,तेव्हा मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होतात. त्यावेळेस ते जात असतात. पण ज्यावेळेस पक्षाचे प्रमुख म्हणून जातात तेव्हा मी आणि प्रफुल पटेल अनेकदा बैठकीत सहभागी झालो आहे. त्यामुळे आजच्या बैठकीचा वेगळा अन्वयार्थ काढु नये असे देखील तटकरे यांनी सांगितले. महायुती म्हणून आम्ही एकत्रित आहोत, आगामी निवडणूका एनडीएच्या नेतृत्वात मजबूतीने लढणार आहोत.महायुती म्हणून विधानसभेच्या निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.